• Download App
    पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात; सुप्रियांच्या जागी युगेंद्र लोकसभेच्या आखाड्यात??|Sharad pawar may field yugendra pawar instead of supriya sule as loksabha elections candidate in baramati

    पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात; सुप्रियांच्या जागी युगेंद्र लोकसभेच्या आखाड्यात??

    नाशिक : पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात!!, असे खरंच घडते आहे. काका पुतण्या मध्ये फूट पडल्यानंतर काकांचा पक्ष पुतण्या घेऊन गेला. त्यामुळे काकांनी पुतण्याच्या सख्ख्या भावाचाच मुलगा फोडला आणि आपल्या पक्षाच्या कार्यालयात आणला.Sharad pawar may field yugendra pawar instead of supriya sule as loksabha elections candidate in baramati

    शरद पवारांनी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना फोडले आणि ते बारामतीच्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज येऊन गेले. अजित पवारांना पवार कुटुंबात एकटे पाडलेले नाही. मुळात पवार कुटुंब फुटलेलेच नाही. कुटुंब वेगळे आणि राजकारण वेगळे, अशी वक्तव्ये युगेंद्र पवारांनी केली.



    त्याचवेळी त्यांनी आणखी एक “रहस्य भेद” केला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढतच होणार नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांविरुद्ध प्रचार करण्याचा प्रश्नही उद्भवणार नाही. उलट शरद पवारांनी सांगितले, तर आपण सुप्रिया सुळे यांचा प्रचार करू, असे युगेंद्र पवारांनी सांगितले.

    शरद पवारांनी चारच वर्षांपूर्वी विद्या प्रतिष्ठान वर सदस्य म्हणून त्यांची निवड केली. त्यामुळे ते नियमित बैठकीत बारामतीत येत असतात. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेट दिली. पवार सांगतील तेच आपण यापुढे करू, असे युगेंद्र पवारांनी स्पष्ट केले.

     युगेंद्र पवार सरप्राईज कॅंडिडेट??

    पण त्यामुळेच शरद पवारांच्या नव्या वेगळ्याच खेळीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली. अजित पवारांनी आपला पक्ष स्वतःकडेच खेचून घेतला, तर आपण अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांना फोडू शकतो आणि त्यांच्याच मुलाला म्हणजे योगेंद्र पवार यांना “सरप्राईज कॅंडिडेट” म्हणून सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी बारामतीच्या मैदानात लोकसभेचा उमेदवार म्हणून उतरवू शकतो, असे शरद पवारांनी नव्या खेळीतून सूचित केले आहे. पण या निमित्ताने शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात!!, असे घडले आहे.

    पण त्याचवेळी पवारांना आपली फक्त बारामती राखण्यासाठीच खूप मोठी राजकीय खेळी केल्याचे भासवून आपल्याच घरात फूट पाडून नव्या पिढ्यांना राजकारणात आणायची वेळ आली आहे, हेच यातून दिसून येते. त्याचबरोबर बारामती सोडून कर्जत जामखेडचा अपवाद वगळता इतरत्र कुठल्याही मतदारसंघात आपल्या घरातल्या कोणालाच उभे करून व्यापक राजकारण करणे पवारांना जमत नाही, हेही यातून सिद्ध होते.

    Sharad pawar may field yugendra pawar instead of supriya sule as loksabha elections candidate in baramati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!