Yugendra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांचा रेकॉर्ड होणार! युगेंद्र पवारांनी सांगितला विजयाचा आकडा
राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी मतदारसंघात मतदान पार पडले असून, आता 4 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयापेक्षा त्यांच्या मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी बारामतीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या संभाव्य मताधिक्याचा आकडा वर्तवला आहे.