विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad pawar लोकसभा निवडणुकीतल्या चांगल्या परफॉर्मन्सचा हुरूप आल्यानंतर महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुका नंतर मुख्यमंत्री कोण होणार याची स्पर्धा वाढली आहे. ती स्पर्धा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात तर आहेच, पण पक्षांतर्गत देखील अनेक नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातून अनेक जण पोस्टरवरचे मुख्यमंत्री बनले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण मुख्यमंत्री होणार??, असा सवाल विचारल्यावर शरद पवारांनी उत्तर दिले, अजून कशाचा काही पत्ता नाही. निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे मराठीतली एक म्हण आहे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी!!, असला हा प्रकार आहे. मात्र ही म्हण सांगून आपण जातीय बोलत नसल्याची मखलाशी पवारांनी केली. Sharad pawar
शरद पवार सध्या सांगली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक स्थानिक राजकीय नेते, आजी-माजी आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी सहकारी होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू असल्याचं बोललं जात असताना त्यावर शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येणार?
यावेळी पत्रकारांनी हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येणार असल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी शरद पवारांनी सूचक विधान केलं. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिलाय असं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच शरद पवार म्हणाले, “हर्षवर्धन पाटील यांनी कधी राजीनामा दिलाय? आज काय ठरतंय ते बघू. आज दुपारी 2.00 वाजेपर्यंत काय होतंय ते बघा. नंतर बोलू”, असं म्हणत शरद पवारांनी पाटील शरद पवार गटात येणार असल्याचेच सूतोवाच केल्याचं सांगितलं जात आहे.
राजेंद्र देशमुख भाजपातून शरद पवार गटात येण्याच्या तयारीत असल्याबाबत व त्यांनी थेट माध्यमांशी बोलताना तशी घोषणाच केल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर लगेचच राजेंद्र देशमुख यांनी ही घोषणा केली. त्यावर शरद पवार म्हणाले, “त्यांनी असं सांगितलं?” यानंतर पत्रकारांनी पवारांना थेट राजेंद्र देशमुख यांचा व्हिडीओच दाखवल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “हे सगळे जुने सहकारी भलतीकडे गेले असतील. त्यांच्या लक्षात आलं की हा रस्ता काही खरा नाही. आपल्या योग्य रस्त्याने गेलं पाहिजे. म्हणून येतात. स्वागत आहे. आमचं म्हणणं आहे की एकत्र येऊन लोकांचं काम करू. महाराष्ट्राला मोठं करू”, असं ते म्हणाले.
पवारांनी चमकून पाहिलं!!
या चर्चेदरम्यान एका पत्रकाराने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबाबत पवारांना प्रश्न केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत असून तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठीही इच्छुक आहात असं सांगितलं जात आहे’ असा प्रश्न करताच शरद पवारांनी चमकून पत्रकाराकडे पाहात विचारलं “मी?” यावर प्रश्न अधिक स्पष्ट करत ‘तुम्ही म्हणजे शरद पवार गट या पदासाठी इच्छुक आहे का’ असा प्रश्न केला गेला. त्यावर शरद पवारांनी मिश्किल हास्य करत उत्तर दिलं.
आमच्या पक्षात आम्ही याची चर्चा केली. एक म्हण आहे. मी हे जातीय बोलतोय असं समजू नका. बाजारात तुरी, भट भटणीला मारी. कशाचा काही पत्ता नाही, आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. सरकार बनवायचं तर त्यासाठी बहुमत पाहिजे. बहुमत मिळालं तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होईल. जयंत पाटील कधी असं बोलतात का? त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले.
Sharad pawar made casteist statement over chief minister issue
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्यातील एका मागणीची आज पूर्तता झाली’ ; राज ठाकरेंची विशेष प्रतिक्रिया
- Marathi : मोदी सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा; पण तो काँग्रेसला मात्र टोचला!!
- Karnataka : कर्नाटकचे आरोग्यमंत्री अडचणीत, सावरकरांचे नातू करणार मानहानीचा दावा
- Siddaramaiahs : सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या; आता MUDA प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप!