• Download App
    Sharad Pawar lays the trunk ine Thackeray brothers unity ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच पवारांचा

    ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच पवारांचा त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!

    Sharad Pawar

    नाशिक : मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.Sharad Pawar lays the trunk ine Thackeray brothers unity

    माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पवार सध्या बारामतीत गोविंद बागेत मुक्काम ठोकून आहेत. पण तिथूनच ते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. बारामतीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वेगवेगळ्या राज्यीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर विश्लेषणात्मक भाष्य केले. मात्र त्याचवेळी त्यांनी अत्यंत चतुराईने ठाकरे बंधूंच्या ऐक्यात महाविकास आघाडीचा खोडा घातला.



    शरद पवार म्हणाले, मुंबईत आमच्या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याशी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून महापालिका निवडणूक एकत्र लढविण्याचा आम्ही निर्णय घेऊ.

    दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करत असताना पवारांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या ताकदीच्या टेकूची लालूच दाखविली. ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत, तरी महाविकास आघाडीची ताकद उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका मिळवून देईल, अशी ही लालूच आहे. वास्तविक पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई महापालिकेत कुठलीही ताकद नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना देखील पवारांना मुंबईत 10 – 12 नगरसेवकांपेक्षा जास्त नगरसेवक कधी निवडून आणता आले नाहीत. पण तरी देखील पवारांनी मुंबईचा राजकारणामध्ये वेगवेगळ्या मार्गाने शिरायचा प्रयत्न केला. त्यांचे आधीचे खंदे शिलेदार सचिन अहिर आणि नवाब मलिक त्यासाठी प्रयत्न करत असायचे, पण आता सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, तर नवाब मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने पवारांची राष्ट्रवादी मुंबईत राजकीय दृष्ट्या उघड्यावर पडली. म्हणूनच पवारांना उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईत जास्त असल्याचा “साक्षात्कार” झाला आहे.

    अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले, तर त्यांची ताकद अधिक वाढेल आणि त्यांची लढाई भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याशी होईल. पण या लढाईचा खरा फटका काँग्रेस आणि आपल्या राष्ट्रवादीला बसेल. कारण ठाकरे बंधूंची युती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते कापून स्वतःकडे खेचेल, याची जाणीव पवारांना झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंचे ऐक्य प्रत्यक्षात येण्यापूर्वीच पवारांनी चतुराईने त्यामध्ये महाविकास आघाडीचा खोडा घालून टाकला.

    Sharad Pawar lays the trunk ine Thackeray brothers unity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण