विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किती खार खाऊन आहेत, याचे अत्यंत 2019 च्या निवडणुकीत आले होतेच. त्यावेळी पवारांनी तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून फडणवीसांवर टीका करताना आपल्या राजकारणाची पातळी घसरल्याची जाणीव महाराष्ट्राला करून दिली होती. पण आता त्यापलीकडे पवारांची पातळी आणखी घसरली आहे. बुलढाण्यासारख्या गंभीर अपघातावरून देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.Sharad pawar hit below the belt; target devendra fadnavis over buldhana bus accident
समृद्धी महामार्गावर अपघातात जो मरण पावतो तो “देवेंद्रवासी” होतो, असे लोक म्हणतात, अशी राजकीय टीका करून पवारांनी आपली पातळी घसरल्याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.
समृद्धी महामार्गाची संकल्पना आणि सुरुवात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले आणि त्याला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिले. महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या ऐकून एक प्रकल्पात पवार कुठेच नव्हते. याची सल पवारांना आहे. महाराष्ट्रात कोणतेही मोठे आणि भव्य दिव्य प्रकल्प आपण सोडून इतर राज्यकर्ते करतात, हे पवारांसारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्याला सहनच होत नाही आणि त्यातूनच त्यांनी आपली पातळी आणखी घसरवून देवेंद्र फडणवीस यांसारख्या त्यांच्या तुलनेत तरुण असलेल्या नेत्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली.
समृद्धी महामार्गावर सतत अपघात होतात त्यामुळे केवळ नुकसान भरपाई देऊन भागणार नाही. त्यावर गांभीर्याने काही उपाययोजना केली पाहिजे, अशी सूचना पवारांनी पुण्यातल्या आजच्या पत्रकार परिषदेत जरूर केली. पण तेवढ्यावरच थांबण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. त्या पलीकडे जाऊन बुलढाणा सारख्या गंभीर अपघाताच्या वेळी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीची वैरभावना पवार आपल्या मनातून दूर ठेवू शकले नाहीत.
एरवी पवार महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाचा हवाला राष्ट्रवादीचे नेते सोडून इतर पक्षाच्या नेत्यांना देत असतात महाराष्ट्राची विशिष्ट राजकीय संस्कृती आहे. त्यामध्ये नेते एकमेकांवर टीका करतात पण वैयक्तिक पातळीवर एकमेकांविषयी सुसंस्कृतपणे बोलतात, असे पवार सांगत असतात. पण बुलढाण्यासारख्या गंभीर अपघाताच्या वेळी विधायक सूचना करतानाच स्वतः मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्याविषयीचा राजकीय वैरभाव बाजूला ठेवत नाहीत, हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले.
Sharad pawar hit below the belt; target devendra fadnavis over buldhana bus accident
महत्वाच्या बातम्या
- भीषण अपघात! समृ्द्धी महामार्गावर बस जळून खाक, २५ प्रवाशांचा मृत्यू
- पवारांना अपेक्षित अजेंडा मराठी माध्यमांनीच केला “फेल”!! वाचा, कोणता आणि कसा??
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव
- मी “भोसले” नसल्याचा एक तरी पुरावा द्या, अन्यथा माफी मागा; आचार्य तुषार भोसलेंचे शरद पवारांना खणखणीत प्रत्युत्तर