• Download App
    Sharad Pawar Group EC Relief Pipani Symbol Removed Tutari Confusion Photos Videos शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा; '

    Sharad Pawar, : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा; ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

    Sharad Pawar,

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sharad Pawar, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.Sharad Pawar,

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’ (राष्ट्रवादी) आणि ‘पिपाणी’ (अपक्ष) या दोन्ही चिन्हांमध्ये नावाचे व दर्शनाचे साधर्म्य असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या नामसाधर्म्यामुळे पक्षाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाली. तसेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 9 उमेदवार याच चिन्हामुळे पडल्याचा दावा पक्षाने केला होता.Sharad Pawar,



    लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाकडून ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हांच्या यादीतून त्वरित वगळण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. निवडणूक आयोगाने अखेर राष्ट्रवादीची मागणी मान्य करत आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) हे चिन्ह गोठवले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांचा संभ्रम टळणार आहे.

    लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला मिळालेली मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

    रावेर – एकनाथ साळुंके (पिपाणी चिन्ह) : 43,957 मते
    दिंडोरी – बाबू भगरे (सर) : 1,03,632 मते
    भिवंडी – कांचन वखरे : 24,625 मते
    बारामती – शेख सोएलशहा : 14,917 मते
    शिरूर – मनोहर वाडेकर : 28,324 मते
    अहमदनगर – गोरख आळेकर : 44,597 मते
    बीड – अशोक थोरात : 54,850 मते
    सातारा – संजय गाडे : 37,062 मते
    पक्षाने मानले निवडणूक आयोगाचे आभार

    दरम्यान, निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचे चित्र खूप वेगळे असते. पण असो! देर आए दुरुस्त आए..! असे म्हणत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे.

    पिपाणी चिन्ह हटवल्याने अपक्ष नाराज

    दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांनंतर विधानसभा निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी ‘पिपाणी’ हे चिन्ह मिळवण्यासाठी मोठी मागणी केली होती. विशेषतः शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड या मतदारसंघांत या चिन्हाला मोठी पसंती मिळाली होती. तसेच जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या मतदारसंघांत शरद पवार गटाचे उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा अधिक मते ‘पिपाणी’ चिन्हावरील अपक्षांना मिळाली होती. जर ही मते विभाजित झाली नसती, तर राष्ट्रवादीचे 19 आमदार निवडून आले असते, असा दावा करण्यात आला होता.

    Sharad Pawar Group EC Relief Pipani Symbol Removed Tutari Confusion Photos Videos

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Laxman Hake : मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार; लक्ष्मण हाके यांचा पक्षांना इशारा; बोगस कुणबींना विरोध

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची टीका- धनंजय मुंडे म्हणजे शेखचिल्ली, ज्या फांदीवर बसतात तीच तोडतात, नार्को टेस्टचाही उल्लेख

    Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- अजित पवारांवर सत्ता सोडण्याची वेळ आणली जाईल; महायुतीत पहिला आघात राष्ट्रवादीवर होईल