• Download App
    Sharad Pawar Frowns Congress MNS Alliance Local Polls MVA | VIDEOS मनसेला आघाडीत घेण्यास पवारांची अनुकूल भूमिका, काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांना फटकारले

    Sharad Pawar : मनसेला आघाडीत घेण्यास पवारांची अनुकूल भूमिका, काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांना फटकारले

    Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : Sharad Pawar  मनसेला मविआत घेण्याविषयी काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. मनसेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोबत घेण्याविषयी शरद पवार अनुकूल असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.Sharad Pawar

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ‘मनसे’ला सोबत घेणार का, या प्रश्नावर पवारांनी सांगितले की, “आघाडीतील नेत्यांनी यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. काँग्रेसने लगेच टोकाची भूमिका घेऊ नये, ‘मनसे’ला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चा आहेत, असेही पवार म्हणाले. मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, धाराशिव या जिल्ह्यातील काही गावांतील राजकारण अलीकडे बिघडले आहे. मराठा कुणबी आणि ओबीसी यांच्यात जातीय राजकारण करून अंतर निर्माण केले जात आहे.Sharad Pawar



    पवार कुटुंबात महाभारत

    राजकारणातील भीष्म पितामह म्हणून परिचित असलेल्या शरद पवारांनी कोरेगावातील जमीन घोटाळा प्रकरणात चुलत नातू पार्थ पवारविरोधात कठोर भूमिका घेतली. हा घोटाळा गंभीर घोटाळा असल्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस म्हणतात. त्यानुसार हे प्रकरण खरोखरच गंभीर असेल तर त्यांनी पार्थ यांची चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, असे त्यांनी शनिवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे जमीन घोटाळ्याला कौटुंबिक राजकारणाची धार प्राप्त झाली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा कोरेगावप्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे.

    दोन दिवसांपूूर्वी पहिल्यांदा घोटाळा उघडकीस आला. तेव्हा शरद पवारांच्या कन्या, पार्थ यांच्या आत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, पार्थ कधीच चुकीचे करू शकत नाही. याविषयी शरद पवार म्हणाले की, ते सुप्रियांचे व्यक्तिगत मत असू शकते. पण पक्षाची भूमिका चौकशी करून सत्य समोर आणणे हीच आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू. जमीन घोटाळ्यातील एक आरोपी शीतल तेजवाणी या त्यांच्या पतीसह विदेशात फरार झाल्याच्या वृत्तावर ते म्हणाले की, ‘हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे, आरोप करणाऱ्यांनीच शोधून आणावे. दरम्यान, पुण्यात पार्थ यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा समोर आला. त्यातही पार्थ वगळता तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.

    सहा वर्षांपूर्वी मावळ लोकसभा लढवण्यावरून शरद पवार – पार्थ यांच्यातील नाते बिनसले

    २०१९ लोकसभा : पार्थ यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा लढवण्याचा हट्ट धरला. त्यामुळे शरद पवारांना माढा लोकसभेतून माघार घ्यावी लागली. तेव्हापासून ते पार्थवर नाराज आहेत. पार्थ यांचा २०१९मध्ये मावळमध्ये पराभव झाला होता.

    सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : पार्थ यांनी सिनेअभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. तेव्हा संतप्त पवारांनी ‘पार्थ अपरिपक्व आहेत. त्यांच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही’ असे म्हटले होते.

    मोदींचे अभिनंदन : एकीकडे शरद पवार राम मंदिराच्या विरोधात असताना पार्थ यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी पत्र लिहून मोदींचे अभिनंदन केले होते.

    Sharad Pawar Frowns Congress MNS Alliance Local Polls MVA | VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स;10 नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश; आझाद मैदान आंदोलनातील कथित उल्लंघनाचे प्रकरण

    Radhakrishna Vikhe Patil : आधी सोसायटी काढायची,मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

    Parth Pawar, : पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा आणखी एक घोटाळा; पुण्यात जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार, 22 दस्त नोंदणीची चौकशी- मंत्री पाटील