विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाविकास आघाडीत काँग्रेस शरद पवार ( sharad pawar ) आणि उद्धव ठाकरे हे आज एकत्र असले, तरी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांची दोनदा भेट घेतली. मराठा आरक्षण आणि साखर कारखानदारांना मदत असे या भेटीचे उघड विषय असले, तरी दोघांची बंद दाराआड झालेली चर्चा महाराष्ट्रात राजकीय संशयाचे मळभ निर्माण करून गेली. अदानी समूहाला धारावी विकासाचे कंत्राट देण्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे बोलले गेले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्ली मुक्कामी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांपेक्षा वेगळा सूर लावला.
एका धारावीच्या 20 धारावी मी होऊ देणार नाही. कंत्राटामध्ये नसलेल्या जमिनी देखील सरकार अदानींच्या घशात घालणार असेल, तर ते मी मान्य करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शरद पवार गेले होते. त्या भेटीच्या वेळी मी तिथे नव्हतो. त्यामुळे त्या भेटीविषयी जे काही बोलायचे, ते शरद पवारच बोलू शकतील, पण धारावी संदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे. धारावीतल्या नागरिकांना त्यांच्या व्यवसायासकट तिथेच मोठे घर मिळाले पाहिजे. त्यांना मुंबईतल्या इतरत्र भागांमध्ये हलवून एका धारावीच्या 20 धारावी मी होऊ देणार नाही. धारावीचा विकास करणे अदानींना जमणार नसेल तर त्यांनी तसेच स्पष्ट सांगावे, असा इशारा देऊन उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा वेगळा सूर लावला.
– ठाकरेंचा दिल्ली दौरा
एरवी फक्त आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही महत्त्वाच्या राजकीय दौऱ्यात असतात, पण यावेळच्या दिल्ली दौऱ्यात रश्मी ठाकरे देखील त्यांच्या समवेत आहेत. शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये रश्मी ठाकरेंचा एकूण सहभाग लक्षात घेतला, तर त्या उद्धव ठाकरे यांच्या समवेत दिल्ली दौऱ्यात असणे याचे विशेष महत्त्व अधोरेखित होते.
उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत राहणार असून ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
आज काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, खासदार कल्याण काळे, खासदार विशाल पाटील आदी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती वर मात केली. 48 पैकी 31 जागा मिळवल्या. त्यात काँग्रेसच्या 14 आणि शिवसेनेच्या 9 जागांचा वाटा महत्त्वाचा आहे. पवारांच्या राष्ट्रवादीने 8 जागा मिळाल्या ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे स्वतंत्रपणे सूत जुळवण्याच्या बेतात असल्याची चिन्हे दिसली. मुंबईमध्ये धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानींना देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एक आहेत, तर एकनाथ शिंदे शरद पवार एक झाल्याचे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने त्याचबरोबर काँग्रेससाठी देखील मुंबई मधले 32 मतदार संघ महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पवारांना बाजूला ठेवून परस्पर आपापसात जागांच्या वाटाघाटी करण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेही उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे दोन्ही घटक महाविकास आघाडीत शरद पवारांपेक्षा जास्त विश्वासार्ह आहेत. पवार कधी कोलांटउडी मारून दुसरा नाहीतर तिसराच डाव खेळतील, याची कुणालाच गॅरेंटी देता येत नाही.
महाराष्ट्रात शरद पवार हे 2014 सारखा कुठला प्रयोग करून एकनाथ शिंदे यांना गळाला लावण्याच्या बेतात असतील तर आपणही काही कमी नाही. आपणही परस्पर काँग्रेसशी समझोता करून पवारांना वेगळा धक्का देऊ शकतो, हे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचे असल्याचे बोलले जात आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात पवारांबरोबर जागावाटपाचा संघर्ष करत बसण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर समझोता करून जास्तीत जास्त जागा लढवून काँग्रेस देखील विधानसभा निवडणुकीमध्ये नंबर एकचा पक्ष हे स्थान टिकवण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊ शकते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा तीन दिवसांचा दिल्लीत दौरा महत्त्वाचा आहे.
sharad pawar eknath shinde meets
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या मुक्ती संग्रामाचे “नोबेल प्रलाप”; वंगबंधू म्युजियम + इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आगीत खाक!!
- Dhirendra Shastri : बांगलादेश हिंसाचारावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- Sheikh Hasina : शेख हसीना यांना आणखी एक धक्का, ब्रिटननंतर अमेरिकेनेही त्यांना आश्रय नाकारला!
- CM Eknath Shinde : प्रत्येक गावात मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ कार्यान्वित करा – मुख्यमंत्री शिंदे