नाशिक – सन १९९९ ची विधानसभा निवडणूक… स्थळ – भोर. काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सोनिया गांधी यांची देशातली पहिली जाहीर सभा भोरच्या माळावर प्रचंड गर्दीत झाली होती. सोनियाजींनी देशातली आपली पहिली जाहीर सभा अनंतराव थोपटे यांना दिल्याची त्यावेळी जोरदार चर्चा देशभर रंगली होती. sharad pawar defeted anantrao thpate in 1999 assembly election, will sharad pawar accept sangram thopate as aseembly speaker??
या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता अनंतराव थोपटे निवडून येणार आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. कारण अनंतराव हे त्यावेळी काँग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ नेते होते. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या दोन्ही काँग्रेस नेत्यांपेक्षा ते ज्येष्ठ नेते होते. सोनियाजींनी पहिली जाहीर सभा त्यांना देणे हे political indication होते. कारण त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती. त्याच पवारांच्या पुणे जिल्ह्यातील भोरच्या अनंतराव थोपटे यांना बळ देण्याचे सोनियाजींनी ठरविले होते.
… पण त्या निवडणूकीत अनंतराव थोपटे यांचा राष्ट्रवादीच्या काशिनाथ खुटवड यांनी पराभव केला. अनंतरावांच्या उभरत्या कारकिर्दीला शरद पवारांनी धक्का दिला होता. आपल्या नेतृत्वाला पुणे जिल्ह्यातून आव्हानच उभे राहाता कामा नये, हा पवारांचा मनसूबा तेवढ्यापुरता यशस्वी झाला. पण अनंतरावांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ते संपवू शकले नाहीत.
अनंतरावांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनी अनंतरावांची राजकीय कारकीर्द पुढे काँग्रेसमधूनच पुढे चालू ठेवत तीनदा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. भोरमध्ये काँग्रेस त्यांनी मजबूतीने उभी केली आहे. आता संग्राम थोपटे यांचे नाव काँग्रेसने पुढे आणले आहे. ज्या अनंतराव थोपटे यांना शरद पवारांनी पाडले आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद घालविले त्या अनंतराव थोपटे यांच्या चिरंजीवांना विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसल्याचे पवारांना पाहावे लागणार आहे… की पवार विधानसभा निवडणूकीत अनंतरावांवर केलेला “प्रयोग” त्यांच्या चिरंजीवांच्या बाबतीत अध्यक्षपदाच्या निवडणूकीत करणार…?? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
sharad pawar defeted anantrao thpate in 1999 assembly election, will sharad pawar accept sangram thopate as aseembly speaker??
महत्त्वाच्या बातम्या
- होय हप्तावसुलीसाठीच चौकशी, ईडीने ठणकावल्याने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावेच लागणार
- जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनामुळे राष्ट्रीय सुरक्षेत वाढ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास
- अमृता फडणवीस म्हणाल्या, हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान
- आरोग्यमंत्र्यांचा लिपलॉक टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच आता चौकशी
- दक्षिण कोरियाही उभारणार आयर्न डोम यंत्रणा, उत्तर कोरियाच्या युध्दपिपासू धोरणामुळे निर्णय
- हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांचे इनाम, बरेलीतील मौलानाला पोलीसांनी केली अटक