• Download App
    Sharad Pawar Admitted to Ruby Hall Pune: Condition Stable, Says Doctor शरद पवारांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर; सततच्या दगदगीमुळे तब्येत खालावल्याची माहिती

    Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर; सततच्या दगदगीमुळे तब्येत खालावल्याची माहिती

    Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. पण तब्येत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Sharad Pawar

    अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले होते. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्याने श्रद्धांजली कार्यक्रम व भेटीगाठींमध्ये व्यस्त होते. यामुळे त्यांची दगदग वाढली होती. त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. आज अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी घरीच विश्रांती घेणे पसंत केले होते. पण त्यानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर डॉक्टरांच्या सल्लानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हलण्याचा निर्णय घेण्यात आला.Sharad Pawar



    पुण्यात आणण्यासाठी विशेष व्यवस्था

    त्यानुसार शरद पवार यांना बारामतीहून पुण्यात आणण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या ताफ्यात वैद्यकीय पथकासह कार्डियाक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका ठेवण्यात आली. काही वेळापूर्वीच ते रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर सिमोन ग्रँट यांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यावरील पुढील उपचारपद्धती ठरवली जाणार आहे. गरज भासली तर त्यांना रुग्णालयात अॅडमिटही केले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत आहे. आज सकाळपासून त्यांचा त्रास वाढला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेही आहेत.

    ऑक्सिजन मास्क घालून बेडवरुनच तपासण्या सुरू

    शरद पवारांना सुरूवातीला गाडीतून व्हिलचेअरवर बसवून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना ऑक्सिजन मास्क घालून बेडवरुनच तपासणीला नेण्यात आले. त्यांचा यासंबधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रोहित पवारही शरद पवारांसोबत रूग्णालयात आहेत. सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दगदगीमुळे पवारांच्या छातीत कफ झाला असून, त्यांच्या योग्य त्या तपासण्या केल्या जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

    सुप्रिया सुळेंचा डॉक्टरांशी संवाद

    शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ एक कौटुंबिक सदस्य म्हणून नाही, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टरांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल तसंच आम्ही सगळे वागू. तुमचं सजेशन आमच्यासाठी अंतिम राहील,’ असे म्हणत त्यांनी उपचाराची पूर्ण सूत्रे डॉक्टरांच्या हाती सोपवली. माध्यमांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी त्यांनी विनंती केली की, ‘पुढील १० मिनिटांत डॉक्टर स्वतः माध्यमांना शरद पवार यांच्या प्रकृतीची अधिकृत माहिती देतील.’ तसेच कोणत्याही व्हिजिटर्सला आत सोडू नका. हॉस्पिटलचे सगळे नियम काटेकोरपणे पाळा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.

    कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये – रोहित पवार

    आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो रुग्णालयात तुम्ही येऊ नका. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही इकडे येऊ नका. त्यांना काही प्रमाणात कफ आहे. थोडे दिवस इथे ठेवले जाईल. ते आयसीयूमध्ये नाहीत, तर खाजगी रूममध्ये दाखल आहेत. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. तेथील डॉक्टर अभिजीत लोढा आपल्या सर्वांना शरद पवार यांच्या प्रकृती बद्दल माहिती सांगतील.

    डॉक्टरांनी काय दिली प्रकृतीची माहिती

    डॉक्टर अभिजीत लोढा यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे शरद पवारांच्या छातीत कफ झाला आहे. आम्ही योग्य त्या तपासण्या केल्या आहेत. ट्रीटमेंट चालू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर आम्हाला उपचारात काय बदल करायचा असेल ते बदल करू. सध्या रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आणखी काही माहिती सांगू शकत नाही. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही. पवार साहेब आता रूममध्ये आहेत. त्यांना दोन – तीन दिवसांपासून त्रास होता. ते नॉर्मल बोलत आहेत, असे डॉक्टर म्हणाले.

    Sharad Pawar Admitted to Ruby Hall Pune: Condition Stable, Says Doctor

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : बारावी परीक्षेसाठी राज्यात 15.32 लाख विद्यार्थी नोंदणी:3,387 केंद्रांवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा

    Nitesh Rane : महायुतीच्या नावावर कमळ पाडणाऱ्यांना सोडणार नाही; अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, नीतेश राणेंचा बंडखोरांना इशारा

    PM Modi : महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अभिनंदन; महाराष्ट्राने पुन्हा आम्हाला पाठिंबा दिला, PM नरेंद्र मोदींची ट्विट करत ZP निकालावर प्रतिक्रिया