• Download App
    Chandrakant Patil जूनपासून मुलींना शाळेतच मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; कमवा आणि शिका योजनेतून दरमहा 2 हजारही मिळणार, मंत्री पाटील यांची घोषणा

    Chandrakant Patil : जूनपासून मुलींना शाळेतच मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; कमवा आणि शिका योजनेतून दरमहा 2 हजारही मिळणार, मंत्री पाटील यांची घोषणा

    Chandrakant Patil

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chandrakant Patil येत्या जून महिन्यापासून मुलींना शाळेतच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 2 हजार मानधन देण्याचीही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.Chandrakant Patil

    जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीत आज कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत कराटे प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास 1 हजार मुलींना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत सांगली जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी आम्ही एक नवा प्रयोग केला. त्यात 50 शाळांमधील 36 हजार मुलींना दर आठवड्याला शनिवारी 1 तास कराटे व ज्युडोचे प्रशिक्षण दिले. त्यातील 15 हजार 400 मुलींना आज आम्ही पहिला यलो बेल्ट दिला. त्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे शुल्क द्यावे लागेल ते प्रशासन देईल.Chandrakant Patil



    येत्या जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठ्याकाठ्याचे प्रशिक्षण मिळेल. सद्यस्थितीत राज्यातील विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या 5 लाख मुलींना सध्या कॉलेज फी लागत नाही. वसतिगृह शुल्क लागत नाही. याशिवाय त्यांना कमवा व शिका योजनेंतर्गत दरमहा 2 हजार रुपयांचे मानधनही देण्यात येईल, असे ते म्हणाले. यावळी खासदार विशाल पाटील यांच्यासह आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह इतर अधिकारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

    माझे म्हातारपण सुखरूप जाईल हा विश्वास – खासदार पाटील

    खासदार विशाल पाटील यांनी यावेळी मुलींचे मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून आपल्याला समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. मला दोन मुली आहेत. मुलींचे हे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल असा विश्वास वाटतो, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान ऐकूण उपस्थितांत एकच हशा पिकला.

    Self-Defense Training for Schoolgirls from June: Minister Chandrakant Patil VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुंबईत १६४ शाळा बेकायदेशीर; पालकांच्या आक्रोशाच्या बातम्या; प्रत्यक्षात १५२ ठिकाणी शाळांच्या नावाखाली मदरसे आणि मशिदींचे बांधकाम!!

    उन्हाळा आणि पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी AI द्या भर; ऊर्जा विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

    Maharashtra Govt : सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित; राज्यातील हजारो तरुणांची निराशा, नोकरीच्या संधी हिरावून घेऊ नका- सुळे