• Download App
    शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते म्हणताना चंद्रकांत खैरे म्हणाले,नवनीत राणा बाई काय होती सगळ्यांना माहित Saying that Shiv Sainiks have intellect in their knees, Chandrakant Khaire said, everyone knows what Navneet Rana was.

    शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते म्हणताना चंद्रकांत खैरे म्हणाले,नवनीत राणा बाई काय होती सगळ्यांना माहित

    शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते असे म्हणताना खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. नवनीत राणा बाई काय होती हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले. Saying that Shiv Sainiks have intellect in their knees, Chandrakant Khaire said, everyone knows what Navneet Rana was.


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते असे म्हणताना खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. नवनीत राणा बाई काय होती हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले.

    खैरे म्हणाले, नवनीत राणा यांच्याबद्दल मी काही बोलतच नाही. मी काही बोललो तर ते व्हायरल होईल. कारण मला त्या बाईचा इतका राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काही बोलते. तो रवी राणादेखील. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते किंवा गुडघ्यात अक्कल असते. आम्ही जाऊन सरळ काहीतरी करु शकतो. कारण आम्हाला हे सहन होत नाही. आमचे ते दैवत आहेत, प्रमुख आहेत. काहीपण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल? ती बाय काय होती, कसंकाय माहिती आहे ना सगळं. जातीचं खोटं प्रमाणपत्र आणून निवडणूक लढवली. आता भाजपचा पाठिंबा आहे म्हणून. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत आली तर ती तिकडे गेली. पक्ष बदलणारी ती बाई आहे.


    इम्तियाज जलील यांनी मारली शिवसेनेत मेख; म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या मदतीमुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव!!


    लोकांना मिसगाईड करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. भाजपकडून शिवसेनेवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. भाजपची पातळी घसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे काम करत आहेत. मात्र हे लोक जिथे तिथे खोडा घालत आहेत, सरकारला काम करू देत नाहीे. आता सहन होत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही” असा इशाराही खैरे यांनी दिला आहे.

    गेली काही दिवस राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांचा वाद सुरू आहे. मातोश्री परिसरात त्यांना हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटले होते. यानंतर 12 दिवस राणा दाम्पत्याला जेलची हवा ही खावी लागली होती.

    वSaying that Shiv Sainiks have intellect in their knees, Chandrakant Khaire said, everyone knows what Navneet Rana was.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के