• Download App
    साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट! Sataras daughter Apoorva Alatkar became the first woman loco pilot to run Pune Metro

    साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट!

    उदयनराजे भोसले यांनी केले खास कौतुक म्हणाले…

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे लोकार्पण झाले. यावेळी आणखी एक मोठी गोष्ट घडली. पुणे मेट्रोचं स्टेअरिंग प्रथमच एका महिलेने सांभाळाल्याचं समोर आलं. साताराची अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट ठरली आहे.  Sataras daughter Apoorva Alatkar became the first woman loco pilot to run Pune Metro

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत वनाझ ते मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली आणि यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला. या प्रवासात कंट्रोलरच्या विविध सूचनांचे व्यवस्थित पालन केले.

    अपूर्वा अलाटकर हिच्या कामगिरीबद्दल उदयनराजे भोसले यांनी ‘’साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने मास्क ऑन की चा वापर करत मेट्रो मार्गस्थ केली. अपूर्वाच्या कामगिरीबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तिला पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.’’ अशा शब्दांमध्ये तिचे अभिनंदन केले आहे.

    साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे.

    Sataras daughter Apoorva Alatkar became the first woman loco pilot to run Pune Metro

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!