• Download App
    Satara साताऱ्यात पूल कोसळला, क्रेनने गाड्या बाहेर काढल्या:मुंबईत रेल्वे ट्रॅक, एक्सप्रेस-वे बंद; घरात राहण्याचा सल्ला; जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन

    Satara : साताऱ्यात पूल कोसळला, क्रेनने गाड्या बाहेर काढल्या:मुंबईत रेल्वे ट्रॅक, एक्सप्रेस-वे बंद; घरात राहण्याचा सल्ला; जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन

    Satara

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Satara देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा येथील भोर घाट सेक्शनमध्ये दोन ठिकाणी भूस्खलन झाले. तिन्ही रेल्वे लाईन प्रभावित झाल्या. 20 रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.Satara

    तिकडे, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरही भूस्खलन झाल्याने रस्ता बंद झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये वेण्णा नदीवरील पूल तुटला. 10-12 पर्यटक अडकले आहेत, गाड्यांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.Satara



    बीएमसीने आज सरकारी, खाजगी आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तर, मुंबई विमानतळावर 17 विमानांची उड्डाणे रद्द झाली.

    लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील खाजगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे.

    तर जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाले. 6-7 गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या. ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

    महाराष्ट्राची संकटाचा सामना करण्याची काय आहे तयारी: 5 मुद्दे

    नागरिकांना केवळ अत्यंत आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज आणि विजेचे खांब यापासून दूर राहावे.
    झाडांखाली वाहने उभी करू नयेत आणि समुद्रकिनारे किंवा पाणी साचलेल्या भागांत जाणे टाळावे.
    परिस्थिती हाताळण्यासाठी सुमारे १५,००० कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
    कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, नागरिक बीएमसीच्या (BMC) १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद
    राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

    वसई-विरारमध्ये पावसाचा हाहाकार:हजारो चाकरमानी स्थानकातच अडकले! लोकल ठप्प, वीज गुल; जनजीवन विस्कळीत

    वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून निर्माण झालेल्या पूरस्थितीत अडकलेल्या 15 नागरिकांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप सुटका केली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणखी 50 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

    राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता:आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात

    राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दलची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.

    Satara, vehicles pulled out by crane; railway tracks and expressways closed in Mumbai; advice to stay indoors;

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra TET : टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा

    FDA Raids : केमिकल दुधाच्या रॅकेटवर ‘एफडीए’ची कारवाई; 5 जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

    Lonavala Tourist : लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू; अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश