वृत्तसंस्था
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मागो आंदोलनाद्वारे जमा केलेली 450 रुपयांची रक्कम सातारा जिल्हा प्रशासनाने त्यांना परत केली आहे. District administration returns Rs. 450 deposited in Bhik Mago Andolan to Udayan Raje Bhosale
शासनाच्या लॉकडाऊनच्या विरोधात उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका येथे आंदोलन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यासमोरच्या आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलन केले होते.
त्यावेळी 450 रुपयांची रक्कम गोळा झाली होती. त्यांनी ती रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने अशी रक्कम स्वीकारता येत नाही, असे सांगून ती रक्कम उदयनराजे भोसले यांना परत केली आहे.