• Download App
    गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!|Sasemira of police inquiry behind Gunaratna Sadavarten; Mumbai to Kolhapur via Satara

    गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  एड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आला आहे. मराठा समाजाबद्दल द्वेषपूर्ण उद्गार काढल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा प्रवास आता मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा असा असणार असून सदावर्तेंच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला आहे.Sasemira of police inquiry behind Gunaratna Sadavarten; Mumbai to Kolhapur via Satara



    सदावर्तेंवर गुन्ह्यांची मालिका

    सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची मालिकाच लागली आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्तेंच्या विरोधात कलम १५३ अ, ब, ५००, ५०६, ५०६, ५०७ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

    कोल्हापूर पोलिसांकडे ताबा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिल रोजी मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्याच दरम्यान साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    सातारा न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले आहे. बुधवारी त्यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी सातारा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र गिरगाव न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाला आहे.

    Sasemira of police inquiry behind Gunaratna Sadavarten; Mumbai to Kolhapur via Satara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस