• Download App
    Sanjay Shirsat: Meet Uddhav Thackeray, Alliance Wishes उद्धव ठाकरेंनी बोलावले तर नक्की भेटेन

    Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंनी बोलावले तर नक्की भेटेन – शिंदे गटाचे संजय शिरसाट; मनसे-ठाकरे युतीला शुभेच्छा

    Sanjay Shirsat

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sanjay Shirsat राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान करत म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर मी नक्की त्यांना भेटायला जाईन.” त्यांनी स्पष्ट केले की, ते राजकारण आणि वैयक्तिक नाती यामध्ये गोंधळ करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.Sanjay Shirsat

    शिरसाट म्हणाले की, “मी आधी राज ठाकरे यांच्या घरीही गेलो होतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही बोलावले, तर त्यांना भेटायला जाण्यात काही गैर नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, ही भेट वैयक्तिक नात्याच्या आधारावर असणार आहे, राजकारणाशी याचा संबंध नाही.



    भेट घेतली म्हणजे पक्ष सोडतोय असा अर्थ काढू नका”

    पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले, “अजित पवार आणि शरद पवारही एकमेकांना भेटतात, त्यामुळे नेत्यांमध्ये भेटीगाठी होणे ही सामान्य बाब आहे. मी उद्धव ठाकरेंना भेटलो म्हणजे मी शिंदे गट सोडतोय, असा चुकीचा अर्थ काढू नका.” त्यांनी यामागे कोणताही राजकीय संकेत नसल्याचे स्पष्ट केले.

    “ठाकरे गट-मनसे युतीला मनापासून शुभेच्छा”

    राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का नाही यावर चर्चा रंगली होती. यावर संजय शिरसाट म्हणाले, “राजकारणात कोणीही एकत्र येऊ नये अशी आमची भूमिका नाही. जर ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.” त्यांनी राजकारणातील विविध शक्यतांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका मांडली.

    “आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि… लग्नाचा सल्ला!”

    संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, त्यांना थोडक्याच शब्दांत खास सल्ला दिला – “लवकर लग्न करा!”
    त्यांनी सांगितले, “पोरगं चांगलं वागावं, बोलावं आणि लवकर लग्न करावं, जेणेकरून वडिलांना त्रास होणार नाही. त्यांना मनापासून शुभेच्छा की ते भविष्यात मोठे नेते व्हावेत.”

    अजित पवारांवरून मतपरिवर्तन

    काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर निधी रोखल्याबद्दल टीका केली होती. मात्र आता त्यांनी स्वतःच स्पष्ट केलं की, “अजित पवारांनी माझ्या विभागासाठी तत्काळ निधी मंजूर केला.” त्यामुळे आता त्यांच्या टीकेतून काहीसे सौम्यपणा दिसून येतो.

    संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या राजकारणात मोकळेपणाचे संकेत दिसत आहेत. शिरसाट यांचा आदित्य ठाकरे यांच्यासाठी दिलेला लग्नाचा सल्ला आणि मनसे-ठाकरे युतीसाठी शुभेच्छा हे सर्वच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. यामुळे आगामी राजकारणात आणखी काही रंगतदार घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    Sanjay Shirsat: Meet Uddhav Thackeray, Alliance Wishes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास; फडणवीस सरकारचे निर्णय

    Manoj Jarange Patil, : मनोज जरांगे यांची टीका- छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा; ओबीसींचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला

    BJP MLA Padalkar : गोपीचंद पडळकरांचा बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप- जेलमध्ये धर्मांतराचे काम; महापुरुषांचे फोटो काढले, कीर्तनही बंद