• Download App
    Sana Malik ठाकरेंचे खासदार फोडले; पण राष्ट्रवादीतले अस्तनीतले निखारे कधी विझवणार??

    ठाकरेंचे खासदार फोडले; पण राष्ट्रवादीतले अस्तनीतले निखारे कधी विझवणार??

    नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला. Sana Malik

    विधानसभेत समान नागरी कायदा आणि ट्रिपल तलाक यांच्या अंमलबजावणीचा मुद्दा भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी थेट भारतामध्ये पाकिस्तान सारखे कुराण लागू करायची मागणी केली. त्यांनी ट्रिपल तलाकच्या विरोधाचे समर्थन केले. त्यांनी समान नागरी कायद्याला विरोध केला. पण महत्त्वाचे म्हणजे सनाम मलिक यांनी भाषण करताना आपले वडील नवाब मलिक यांच्याच राजकीय भूमिकेची आठवण करून दिली.

    – नवाब मलिक मनी लॉन्ड्रीग केस

    नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी सांभाळताना अनेक देशद्रोही बाबी केल्या. त्या उघडकीस आल्या. त्यांनी दाऊद इब्राहिमच्या म्होरक्या बरोबर मनी लॉन्ड्रीग करून जमीन खरेदी केली. त्यामुळे ईडीच्या केस मध्ये कोठडीची हवा खावी लागली. त्यावेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर राजकीय भूमिका घेऊन नवाब मलिक यांचे राजकीय करियर धोक्यात आणले होते. त्यांना मंत्रीपद आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते पद सुद्धा गमवायला लावले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी अजित पवारांना जाहीर पत्र लिहून महायुतीत नवाब मलिक चालणार नाहीत, असे बजावले होते. त्यामुळे अजित पवारांना फडणवीस यांच्या पत्रापुढे म्हणजेच भाजपपुढे झुकावे लागले होते.



    – फडणवीसांची कठोर भूमिका

    नवाब मलिक राष्ट्रवादीमध्ये राहून अशीच पाकिस्तानला आवडणारी भाषा बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना भाजपा विरोधात आगपाखड करत होते. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळ साधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावला. पण सना मलिक यांनी आपल्या वडिलांच्या सुरूंग लागलेल्या कारकिर्दीपासून कुठला धडा शिकला नाही. त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात पाकिस्तानचे समर्थन केले. भारतात कुराण लागू करायची मागणी केली. पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा सना मलिक यांच्या भाषणाचे समर्थक केले. त्यामुळेच राष्ट्रवादीतले आमदार हे भाजपच्या अस्तनीतले निखारे ठरले. भाजपा बरोबर सत्तेत राहून सगळे लाभ उपटायचे. पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचे तुष्टीकरण करत राहायचे, असले उद्योग राष्ट्रवादीवाल्यांनी चालविले. त्यातूनच तर त्यांनी सना मलिक यांच्या भाषणाचे समर्थन केले.

    – आता अस्तनीतले निखारे विझवायची वेळ

    भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीला जाऊन ठाकरेंचे सहा खासदार फोडले. त्यातून फार मोठे राजकारण साधून घेतले. पण आता त्या पलीकडे जाऊन सना मलिक आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या समर्थकांचा राजकीय काटा काढायची वेळ आली आहे. राष्ट्रवादीतले अस्तनीतले निखारे विझवायची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळ साधून नवाब मलिक यांच्या राजकीय कारकीर्दीला वेसण घातली, तशीच योग्य वेळ साधायची आणि राष्ट्रवादीतल्या मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्यांना धडा शिकवायची आता वेळ आली आहे.

    Sana Malik has directly demanded the implementation of the Quran in India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Omraje Nimbalkar : खासदार निधीच्या आरोपांवर ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; मागील टर्मचा एकही पैसा अखर्चित नाही, आधी गणित समजून घ्या!

    Raj Thackeray : राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

    Sana Malik : तिहेरी तलाक आणि UCC वरून विधानसभेत गदारोळ:सना मलिक म्हणाल्या- बहुपत्नीत्व केवळ मुस्लिम धर्मात नाही