• Download App
    Raj Thackeray धमक्या देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना सदावर्ते

    Raj Thackeray : धमक्या देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना सदावर्ते यांनी सुनावले, राज ठाकरेंना सुधारायला सांगा असा दिला सल्ला

    Raj Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Raj Thackeray ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या  प्रमुख राज ठाकरे यांना चांगलेच अंगावर घेतले आहे. राज यांच्या विरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असा सल्ला सदावर्ते यांनी धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला दिला.Raj Thackeray

    सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर मनसे कार्यकर्त्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. याची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे.
    मनसे कार्यकर्त्यानं गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलं कोण बोलतय? सदावर्ते यांच्या या प्रश्नावर मी राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक बोलतोय असं सांगण्यात आलं. त्यानंतर तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कशाला देता? असा सवाल सदावर्ते यांना करण्यात आला.



    या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी सांगितलं की, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. तीन भाषा शिकवण्याचा अधिकार आहे. मला सांगा जर तीन भाष शिकण्याचा अधिकार असल्यानंतर आपण लोकांच्या पोरांना खिशातल्या पैशांनी शिकवतो का ओ?

    त्यानंतर मनसेच्या कार्यकर्यानं गुणरत्न सदावर्ते यांना धमकी दिली. तुमच्या घरावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल, उद्या जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर गाडीची काच फोडली जाईल हे लक्षात ठेवा, असं मनसे कार्यकर्यानं सदावर्ते यांना म्हटलं. दरम्यान त्यानंतर सदावर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले. मला हल्ल्याची भीती वाटत नाही, तुम्ही अशा धमक्या मला देऊ नका, राज ठाकरे यांना सुधारायला सांगा, असा सल्ला सदावर्ते यांनी या मनसेच्या कार्यकर्त्याला दिला.

    दोन महिन्यांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदीच्या सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राज ठाकरे स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी हिंदीला विरोध करून भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे कृत्य गुन्हेगारी संहितेत बसणारे आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    Sadavarte reprimands MNS workers for threatening, advises them to ask Raj Thackeray to reform

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar Plane Crash : AAIB चा प्राथमिक चौकशी अहवाल- अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले:’ब्लॅक बॉक्स’ आणि ‘FDR’ खराब

    Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास; गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी

    CM Devendra Fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचा विचार करण्याचा सल्ला