विशेष प्रतिनिधी
नाशिक : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला. न्यायालयाने त्या खटल्यातून पद्मसिंह पाटील आणि अन्य आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सोडले. त्यामुळे बरेच राजकारण घडले. पवनराजेंचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरली.
पण पद्मसिंहांचा परिवार आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा केंद्रबिंदू शिवसेना – भाजपच्या दिशेने सरकला. तब्बल २० वर्षांच्या अंतराने पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले म्हणून त्यांच्या समर्थकांना आनंद झाला. पण कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सीबीआयने घेतला.
पण तेवढ्यात पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची अफवा सोशल मीडियावर पसरली. अनेकांनी त्यावर क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव आमदार राणा जगजीत सिंह पाटलांनी या संदर्भात लगेच खुलासा केला.
राणा जगजीत सिंहांचे ट्विट :
आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेबांच्या जाहीर सत्काराबाबत अनावधानाने काही सोशल मीडिया आणि बातम्यांतून वृत्त प्रसारित झाले असून वस्तुस्थिती अशी की, कोणताही सत्कार कार्यक्रम नियोजित नाही.
तरी डॉक्टर साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे. अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय अशा वृत्तांना पुढे पसरवू नका.
Rumors regarding the felicitation of Padmasinh Patil; what is Rana Jagjit Singh’s clarification?
महत्वाच्या बातम्या
- UAE : UAE, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करू शकते; एअर डिफेन्स सिस्टिम आकाशतीरवरही चर्चा सुरू
- Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष
- पश्चिम बंगाल मध्ये झालेली चूक काँग्रेस सुधारणार का??; उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आघाडी करणार का??
- ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!