• Download App
    Rohit Pawar रोहित पवारांनी गाठली राहुल गांधींच्या पुढची पायरी!!; आता नव्या विषयावर केले प्रेझेंटेशन!!

    रोहित पवारांनी गाठली राहुल गांधींच्या पुढची पायरी!!; आता नव्या विषयावर केले प्रेझेंटेशन!!

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढची पायरी आज गाठली. राहुल गांधींनी आतापर्यंत फक्त vote chori या विषयावर पत्रकार परिषदा घेऊन प्रेझेंटेशन केले होते, पण रोहित पवारांनी मात्र आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दुसऱ्या विषयावर प्रेझेंटेशन सादर केले. ते प्रेझेंटेशनच्या बाबतीत राहुल गांधींच्या पुढे निघून गेले. Rohit Pawar

    – रोहित पवारांचे आधीचे प्रेझेंटेशन फेल

    रोहित पवारांनी आधी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मुंबई, दिल्ली अन्य काही शहरांमध्ये पत्रकार परिषदांमध्ये प्रेझेंटेशन सादर केले होते. त्या प्रेझेंटेशन मधून अजित पवारांचा अपघात अपघात नसून तो घातपात असल्याचा दावा रोहित पवारांनी अनेकदा केला होता. पण रोहित पवारांच्या त्या प्रेझेंटेशनचा वातावरण निर्मितीच्या पलीकडे फारसा कुठला परिणाम झाला नव्हता. याबाबतीत ते राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन सारखेच अपयशी ठरले होते. राहुल गांधींनी vote chori चे प्रेझेंटेशन करून काँग्रेसला फारसा काही फायदा झाला नव्हता. निवडणूक आयोगाच्या दोन-तीन पत्रकार परिषदांच्या पलीकडे राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनचा विषय सुद्धा फारसा परिणामकारक ठरला नव्हता. रोहित पवारांच्या आधीच्या प्रेझेंटेशनची सुद्धा तीच अवस्था झाली होती. अजित पवारांच्या विमान अपघाताला घातपात ठरविण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी करून पाहिला, पण त्यात त्यांना अपेक्षित असलेले यश आले नाही.



    – मतदारसंघ पुनर्रचनेवर प्रेझेंटेशन

    रोहित पवारांनी आज मात्र अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी प्रेझेंटेशन केले नाही, तर पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना या विषयावर प्रेझेंटेशन सादर केले. महिला आरक्षणाच्या अडून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करून भाजपला २०२७ किंवा २०२८ मध्येच लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या होत्या. २०२९ मध्ये आपण निवडून येणार नाही याची भाजपला खात्री असल्याने भाजपने तो प्रयत्न करून पाहिला, असा दावा रोहित पवारांनी प्रेझेंटेशन सादर करताना केला.

    भाजपकडे कुठले मुद्देच उरले नसल्याने त्यांना लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रनेचा मुद्दा सूचला. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवली 2019 मध्ये राष्ट्रभावना आणि उरी वरच्या हल्ल्याचे राजकारण त्यांनी केले. 2024 मध्ये ते वेगळेच मुद्दे घेऊन निवडून आले. भाजपचे मुद्दे संपले म्हणूनच लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेचा मुद्दा त्यांनी बाहेर काढला, असा दावाही रोहित पवारांनी केला. मतदारसंघांची पुनर्रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजपने नोकरीवर घेतले भाजपने न्यायव्यवस्थेत सुद्धा आपली माणसे पेरली, असा आरोप रोहित पवारांनी केला त्यासाठी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा हवाला दिला.

    – पवार कुटुंबीयांची “डबल गेम”

    रोहित पवारांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन हे प्रेसेंटेशन तेव्हा केले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे आणि महायुतीचे सगळे नेते बारामती मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी जाणार होते. यातून पवार कुटुंब यांचे “डबल गेम” सुद्धा उघड्यावर आली. एकीकडे भाजपच्या सत्तेची वळचण उपभोगायची आणि दुसरीकडे त्याच भाजपला वेगळ्या मुद्द्यावर ठोकायचे, ही पवार कुटुंबीयांची “डबल गेम” रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उघड्यावर आली.

    Rohit Pawar goes ahead of Rahul Gandhi in political gimmick presentations

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारामतीच्या सांगत सभेत आज पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन; तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राज्यभर शक्तिप्रदर्शन!!

    Supriya Sule : डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा सवाल, CM देवेंद्र फडणवीसांचे डिबेट चॅलेंज स्वीकारले

    Nida Khan : अखेर निदा खान TCS मधून निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा