वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यावर गेला आहे. परंतु रुग्ण संख्या वाढती आहे. मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले असून 1,021 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत एकूण 6 लाख 56 हजार 446 जणांनी कोरोनावर मात केली. Corona patient Recovery Rate In Mumbai is 94 percent
रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 27,943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन रुग्णांची संख्या वाढली आहे. मंगळवारी 1,037 रुग्णांचे निदान झाले होते तर 1417 जण बरे होऊन घरी गेले तर बुधवारी 1362 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
पुण्यात 37 जणांचा मृत्यू
पुणे शहरात 683 रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 4 लाख 67 हजार 541 झाली. 1 हजार 158 जणांना डिस्चार्ज दिला आहे. एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 70 आहे. उपचार घेणाऱ्या 8 हजार 356 रुग्णांपैकी 1020 रुग्ण गंभीर तर 2124 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसात 8 हजार 751 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण चाचणी संख्या 24 लाख 60 हजार 516 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 37 जणांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या 8,115 झाली आहे.
Recovery Rate In Mumbai is 94 percent
महत्त्वाच्या बातम्या
- मागण्या मान्य करा अन्यथा संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा बंद करू, वीज कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- संभाजी महाराजांची बदनामी, गिरीश कुबेर यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार
- टोलनाक्यांवरील प्रतिक्षा संपणार, १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोल देण्याची गरज नाही
- पंजाब घोटाळ्यातला आरोपी चोक्सी क्युबाला बोटीने पळून जाताना सापडला जाळ्यात
- दांभिक फेसबूक, ट्वीटरने भारत सरकारला शिकवू नये
- आठ लाखांचे पेट्रोल जाळून 18 हजार रुपयात विमानाने दुबईला सोडले