• Download App
    राज्यसभा निवडणूक : एमआयएमचे शिवसेनेशी मतभेद कायम; 2 मते काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींना!!|Rajya Sabha elections: MIM disagrees with Shiv Sena; 2 votes to Congress' Imran Pratapgadhi

    राज्यसभा निवडणूक : एमआयएमचे शिवसेनेशी मतभेद कायम; 2 मते काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींना!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांनी आदल्या रात्री राष्ट्रवादीचा मतांचा कोटा 42 वरून 44 केला, त्यामुळे शिवसेनेत प्रचंड संताप उसळला असताना दुसरीकडे एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करून निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे.Rajya Sabha elections: MIM disagrees with Shiv Sena; 2 votes to Congress’ Imran Pratapgadhi

    एम आय एमचे शिवसेनेशी मतभेद कायम आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएम पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर एमआयएमची 2 मते काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना देणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी हा निर्णय जाहीर करताना एमआयएमची 2 मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळतील असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात ही दोन मते काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मिळणार आहेत. म्हणजे पुन्हा शिवसेनेचे उमेदवार संजय पवार हेच त्यामुळे अडचणीत येणार आहेत.



    खासदार इम्तियाज जलील यांनी सूचक पद्धतीने शिवसेनेशी मतभेद कायम पण महाविकास आघाडीला मतदान असे ट्विट केले आहे. राष्ट्रवादीच्या कोटा बदलण्याबरोबरच पवारांनी एमआयएमला आपल्या बाजूने वळवून त्यांच्या मतांचा कोटा काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याची खेळी केली आहे. पण त्यामुळे शिवसेनेचा जादाचा उमेदवार आणखी अडचणीत आला आहे.

    Rajya Sabha elections: MIM disagrees with Shiv Sena; 2 votes to Congress’ Imran Pratapgadhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस