विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raju Patil देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. “माजी खासदार आणि माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन योजना कायमची बंद करावी,” अशी मागणी करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे.Raju Patil
राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना स्वतःचाही उल्लेख आवर्जून केला आहे. ते म्हणाले, सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे.Raju Patil
- संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची मोदींची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!
राजू पाटील पुढे म्हणतात, एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेंशन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे. खरंतर माजी खासदार व माजी आमदार (यात मी पण आलो.) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी.संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही राजू पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील खासदारांची संख्या ७२ वर पोहोचणार?
केंद्र सरकार २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. यामुळे लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातून ४८ खासदार लोकसभेत जातात. पुनर्रचनेनंतर ही संख्या ७२ पर्यंत वाढू शकते. खासदारांची संख्या वाढल्यास भविष्यात माजी खासदारांच्या पेन्शनचा आकडाही प्रचंड मोठा असेल, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
संसदेत चर्चेची मागणी
सध्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयकावर सखोल चर्चा होत आहे. याच अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या पेन्शनचा विषयही चर्चेला घ्यावा, अशी विनंती राजू पाटील यांनी केली आहे. सामान्य माणसाने आयुष्यभर काम केल्यावर त्याला पेन्शनसाठी झगडावे लागते, मग लोकप्रतिनिधींना ही सवलत का? असा उपरोधिक सवालही या मागणीतून अधोरेखित होत आहे.
MNS Leader Raju Patil Demands Permanent End to Pensions for MPs & MLAs
महत्वाच्या बातम्या
- Delimitation ला काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध फोल, कारण त्यांना पक्ष विस्ताराचे भय!!
- Turkey : तुर्कस्तानमध्ये 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने गोळीबार केला; 4 जणांचा मृत्यू, हल्लाखोराने स्वतःलाही गोळी मारली
- 33 % महिला आरक्षणाला विरोध नसल्याचे सांगताना विरोधकांची लोकसभेत दमछाक; अडकले मोदींनी टाकलेल्या पेचात!!
- Robert Vadra : गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना समन्स; राउज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी