Raju Patil : आमदार-खासदारांची पेन्शन कायमची बंद करा!; मनसेच्या माजी आमदाराची मागणी
देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. “माजी खासदार आणि माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन योजना कायमची बंद करावी,” अशी मागणी करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे.