• Download App
    Is MIM behind the disappearance of girls from Sambhajinagar? Deputy Mayor Rajendra Janjal questions; Bulldozer will move on Matin Patel's house संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM आहे का? उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सवाल; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

    Sambhajinagar : संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM आहे का? उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सवाल; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

    Sambhajinagar

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Sambhajinagar  संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे.Sambhajinagar

    टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. ती एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी खरेदी केलेल्या एका घरात बिनधोकपणे राहत होती. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी या प्रकरणाचा संबंध थेट एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा संभाजीनगरचे महापौर राजेंद्र जंजाळ यांनीही या प्रकरणी एमआयएमला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला.Sambhajinagar



    बेपत्ता मुली, महिलांमागे एमआयएमचा हात?

    राजेंद्र जंजाळ म्हणाले, एमआयएमने धर्मांतर व लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप असणाऱ्या एका आरोपीला आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर गंभीर गोष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर येथून गत काही महिन्यांत अनेक अल्पवयीन मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. अनेक पोलिस ठाण्यांत मिसिंगच्या तक्रारी दाखल आहेत. पण अद्याप त्यांचा शोध लागला नाही. मग यामागे एमआयएम आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. एमआयएमनेही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हे प्रकरण केवळ निदा खानला आश्रय देण्यापुरते मर्यादित नाही.

    मतीन पटेलच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओच्या बळावर त्याने महिलांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी आहेत. एमआयएमच्या एका नगरसेवकावर 307 चा गुन्हा आहे. दुसऱ्या एका नगरसेवकाची मुंबईच्या ड्रग माफियासोबत भागीदारी आहे. एमआयएमचे लोक असे बेकायदा कामे करतात. ते गुन्हेगारांनाच आपल्या पक्षात घेतात व त्याला उमेदवारी देतात. मागच्या वेळीही एमआयएमचे काही गुन्हेगार नगरसेवक सभागृहात होते. एमआयएम हा गुंड व विघातक कृत्य करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, असे राजेंद्र जंजाळ ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

    मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

    राजेंद्र जंजाळ यांनी निदा खान प्रकरणातील सहआरोपी नगरसेवक मतीन पटेल यांचे घर अनधिकृत असल्याचा दावा करत ते पाडण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. मतीन पटेल यांचे कार्यालय व निदा खानला ज्या घरात लपवण्यात आले होते, ते घर अवैध व अनधिकृत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायद्यानुसार महापालिका त्यावर कारवाई करेल. तशी नोटीस मतीन पटेल यांच्या घरावर लावण्यात आली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी संबंधितांना 3 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. चौथ्या दिवशी मतीन यांच्या घरासह कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात येईल, असे ते म्हणाले.

    निदा खान 40 दिवसांपासून संभाजीनगरात

    जंजाळ पुढे म्हणाले, निदा खान प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 9 एफआयआर दाखल केलेत. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणून 40 दिवस लपवून ठेवले. त्यामुळे आरोपींनी या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे कृत्य झाल्याचे स्पष्ट झाले तर पोलिसांनी सदर व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे. ओवैसी व इम्तियाज जलील यांनी निदा खान व मतीन पटेल यांची पाठराखण केली. या प्रकरणी एमआयएमची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे ते म्हणाले.

    Is MIM behind the disappearance of girls from Sambhajinagar? Deputy Mayor Rajendra Janjal questions; Bulldozer will move on Matin Patel’s house

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitesh Rane : संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही; संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

    Anjali Damania : भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा दावा

    Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न