विशेष प्रतिनिधी
नाशिक : जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.
8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.
– पेरणीची घाई नको
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Rainfall has decreased across most parts of Maharashtra since July 8; this trend is likely to continue for the next 10 days.
महत्वाच्या बातम्या
- Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला
- हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; नकारात्मकतेमुळे कम्युनिस्ट संपले, सकारात्मक विचारांमुळे संघ टिकला!!
- राम मंदिरात चोरी की दरोडा??; नृपेंद्र मिश्रांच्या वक्तव्याला आलोक कुमार यांचा छेद!!
- Chandrima Bhattacharya : ममतांच्या जवळच्या चंद्रिमा यांनी बंगाल टीएमसी अध्यक्षपद सोडले; एक महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला होता