विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुण्यातील एका महिल आयपीएस अधिकाऱ्या चे फुकटात बिर्याणी मागवियाचे प्रकरण ताजे आहेत. यावेळी लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Pune’s female IPS officer demanding free biryani and Prime Minister Narendra Modi’s appeal to the police to change the image
सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात.
ते कित्येक दिवस घरी जाऊ शकत नाहीत, सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते.पोलीसांच्या वास्तव प्रतिमेची जाणीव करून देताना पंतप्रधान म्हणाले, सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे.
कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती कारण पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. तथापि, धारणा पुन्हा नकारात्मक झाली आहे. पोलीस दलात येणाऱ्या नव्या पिढीची ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी आहे.
राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवे. कामगिरीवर असताना राष्ट्रहित कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात.
Pune’s female IPS officer demanding free biryani and Prime Minister Narendra Modi’s appeal to the police to change the image
महत्त्वाच्या बातम्या
- लोकशाहीसाठी निदर्शने करणाऱ्या वेटरला हाँगकाँगमध्ये नऊ वर्षांची कैद
- मिझोराम – आसाम संघर्ष आणखी शिगेला, आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ
- चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस
- भाजपा ई-रावण द्वेषाचा प्रोपोगंडा करताहेत, अखिलेश यादव यांचा आरोप
- आरेला कारेनेच उत्तर देऊ, पण शिवसेना भवन फोडण्याबाबत वक्तव्य केले नाही, आमदार प्रसाद लाड यांनी केले स्पष्ट