• Download App
    पुणे : गिरीष महाजन यांच्या पाच निकटवर्तीयांच्या घरावर छापे । Pune: Raids on the houses of five close associates of Girish Mahajan

    पुणे : गिरीष महाजन यांच्या पाच निकटवर्तीयांच्या घरावर छापे

    पाटील यांनी संस्था देण्यास नकार दिला.त्यामुळे आरोपींनी पाटील यांना संस्थेसंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करून पुण्यात बोलावले. Pune: Raids on the houses of five close associates of Girish Mahajan


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्थेच्या संचालकाचे अपहरण व खंडणीप्रकरणी मागील वर्षी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याच प्रकरणातील महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांच्या घरी पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला, त्यानंतर रविवारी रात्री उशीरापर्यंत पाचही जणांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु होते.

    या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला

    ऍड.विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी 2021 मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थेचे संचालक पाटील हे आहेत. दरम्यान ही संस्था गिरीश महाजन यांना पाहिजे होती.त्यामुळे महाजन यांनी पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. परंतु, पाटील यांनी संस्था देण्यास नकार दिला.त्यामुळे आरोपींनी पाटील यांना संस्थेसंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करून पुण्यात बोलावले. त्यांना खंडणी मागितली, पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेऊन मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला.

    Pune : Raids on the houses of five close associates of Girish Mahajan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा