Girish Mahajan : होय, आम्हीच ढगफुटी केली! हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला, म्हणाले- यांच्या डोक्याची कीव येते
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी दरड कोसळणे, झाड कोसळणे तसेच मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना यामुळे सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला आहे. या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.