सामाजीक सुरक्षा विभागाने आंबेगाव बु येथील ब्रम्हा लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. येथून उत्तर प्रदेशातील दोन तरुणींची सुटका केली आहे.Pune police Social security Department raid in Ambegavao Hotel Brhama
विशेष प्रतिनिधी
पुणे-सामाजीक सुरक्षा विभागाने आंबेगाव बु येथील ब्रम्हा लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. येथून उत्तर प्रदेशातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. तर तीन दलालांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pune police Social security Department raid in Ambegavao Hotel Brhama
विपुल बाबासाहेब बेलदरे ( 36,रा.आंबेगाव बु, ता. हवेली,पुणे) आणि विक्रम करण सोनार (24) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विपुल हा हॉटेल मालक तर विक्रम हा व्यवस्थापक आहे. येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.
यामध्ये मुळच्या उत्तरप्रदेशातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुण घेण्यात येत होता. त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या संजय महतो, केदार मंडल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक करत आहेत.
Pune police Social security Department raid in Ambegavao Hotel Brhama
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारला पाठिंबा दिला म्हणून काय झाले? काँग्रेस नेते नसीम खान शिवसेनेविरुद्ध सुप्रीम कोर्टात लढणारच!!
- पुणे शहरात तीन घरफोड्यांमध्ये सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास
- The Kashmir Files : हिंदूंवर 800 वर्षे राज्य केल्याची वल्गना करणारा मौलवी फारूख आता माफी मागतोय!!
- Bengal Jihadi Terrorism : पश्चिम बंगालमध्ये आमदार निलंबनाचा महाविकास आघाडी पॅटर्न!!