तरुणाविरोधात भारतीय दंड विधान कलम 182, 501 (1) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pune police arrest Jammu and Kashmir youth from Pune airport
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलिसांनी आज (रविवारी) सकाळी या तरुणाला पुणे विमानतळावरुन अटक केली आहे.मानिक प्रताप सिंह (वय 21, रा. गांधीनगर, जम्मू, सध्या रा. भुगाव, पुणे) असे अटक तरुणाचे नाव आहे.पुणे अटक तरुण विधी (लॉ) अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवणे जम्मू काश्मीरचा रहिवासी असणा-या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सिमरन आंम्बुळे (वय 20) यांनी फिर्याद दिली.दरम्यान तरुणाविरोधात भारतीय दंड विधान कलम 182, 501 (1) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानिक प्रताप सिंह हा दिल्लीला जाणा-या विमानात चढत असताना हि सगळी घटना घडली आहे. कारण विमानतळावर ज्यावेळी जवळ तीक्ष्ण, तरल पदार्थ किंवा आगपेटी आहे का ? अशी विचारणा करण्यात आली होती .दरम्यान त्यावेळी मानिक प्रताप सिंहने माझ्याकडे बॉम्ब असल्याचे म्हणाला.
त्यामुळे फिर्यादी आंम्बुळे यांनी तात्काळ CISF यांच्या कडे मानिक प्रताप सिंह विरोधाततक्रार केली, दरम्यान सिंहला तिथून पुढे पुणे पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले.दरम्यान वारंवार सुरक्षा तपासणीचा त्रास झाल्याने आलेल्या रागातून असे बोलल्याचे तरुणाने सांगितले.
Pune police arrest Jammu and Kashmir youth from Pune airport
महत्त्वाच्या बातम्या
- दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनावर ओढले ताशेरे , म्हणाले ….
- पुणे : ‘नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होणार , ते कुठे होणार हे आताच सांगणार नाही ‘ – अजित पवार
- देशात लसीकरणाचे 1 वर्ष : भारताने आतापर्यंत 156 कोटी डोस दिले; सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताची कशी आहे कामगिरी, वाचा सविस्तर..
- प्रियांकांचा ४०% महिला उमेदवारांचा फॉर्म्युला फक्त “यूपी लिमिटेड”; पंजाबात ८६ उमेदवारांपैकी फक्त ७ महिला!!