• Download App
    महाराष्ट्रात 7 मेपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस ; कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट|Pune IMD alerts rain with thunderstorm in Maharashtra till 7 May

    Rain Alert : महाराष्ट्रात 7 मेपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस ; कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट

    वृत्तसंस्था

    पुणे : राज्यात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र, 7 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. Pune IMD alerts rain with thunderstorm in Maharashtra till 7 May

    गारपीट होण्याची शक्यता

    दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासात बुलडाणात सर्वाधिक 30 मी. मी. आणि पुण्यात 27 मी. मी पावसाची नोंद झाली



    पुण्यात वीज पडून दोन मुलींचा मृत्यू

    भोर नसरापूर गावात अंगावर वीज कोसळून दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. सीमा अरुण हिलम (वय 11) आणि ,अनिता सिकंदर मोरे (वय 9) यांचा मृत्यू झाला. चांदणी प्रकाश जाधव ही जखमी आहे.

    Pune IMD alerts rain with thunderstorm in Maharashtra till 7 May

    महत्त्वाची बातमी

     

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला