विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Prakash Ambedkar मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करत समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी लाऊन धरली होती. राज्य शासनाने जीआर काढत मनोज जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या. परंतु, यानंतर राज्यातील ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या शासन निर्णयाला विरोध केला. आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.Prakash Ambedkar
ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे
सरकारने कायद्याला धरून निर्णय घेतला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. सरकारचा निर्णय झाला त्यावेळी मी म्हणालो की सरकारने हा निर्णय कायद्याला धरून घेतलेला नाही. ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. यावेळी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या जजमेंटचा दाखला दिला. सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही, असे त्यात नमूद करण्यात आले होते आणि यावर सुप्रीम कोर्टातही शिक्कामोर्तब झाला आहे, असे त्यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत आपले मत मांडले आहे.Prakash Ambedkar
निझामी मराठा सर्व सत्तेत
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, निझामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहे. निझामी मराठा हे सर्व सत्तेत आहेत, ते ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावतात. सरकारने जे सर्व मराठा ओबीसी आहेत, ही भूमिका घेतली आहे, त्याला ओबीसी विरोध करत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, आणि आरक्षण असूच नये असे गोंधळ घालायला सुरवात केली असल्याचे त्यांनी म्हटले.
ओबीसींना राजकीय धोका ओळखावा
भाजप म्हणतोय की आमचा डीएनए ओबीसी आहे, पण ओबीसींनी हे समजून घेतले पाहिजे की सर्वात मोठा शत्रू ओबीसी आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे. दोन-चार ओबीसी जिल्हा परिषदेला निवडून येण्यापेक्षा सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल असे प्रयत्न केले पाहिजे. ओबीसींना राजकीय धोका आहे हे ओळखून घेतले पाहिजे, असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे.
Prakash Ambedkar, Maratha Reservation, OBC, Supreme Court, PHOTOS, VIDEOS, News
महत्वाच्या बातम्या
- PM Modi पंजाबला पंतप्रधान मोदींकडून १,६०० कोटींचं मदत पॅकेज
- BRICS : ब्रिक्स शिखर परिषदेत चीनची हाक : “टॅरिफ युद्धाला तोंड देण्यासाठी एकजूट आवश्यक”
- सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!
- मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते गेले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी घातले साकडे; महाराष्ट्राचे राजकारण 360° मध्ये फिरल्याचे चिन्ह दिसले!!