Chhatrapati Sambhaji Nagar : टीसी घ्यायला आला आणि शिक्षकालाच भोसकले, छत्रपती संभाजीनगर हादरले! अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आणि त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र ठिकाण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने या विश्वासालाच मोठा हादरा दिला आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.