आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि आता फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
POLITICS: Visit of Chandrakant Patil Amit Shah in Delhi; Now Fadnavis is in Delhi! Delhi winds of BJP leaders in the state increased; Will there be independence?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातल्या भाजप नेत्यांच्या सध्या दिल्ली वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. आधी चंद्रकांत पाटील दिल्ली दरबारी जाऊन आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांच्या भेटीत भाजपच्या राज्यातली कामकाजाबद्दल आणि सहकार क्षेत्राबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली. तसेच चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रतील साखर उद्योगाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीत काय दडलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे. त्या दृष्टीने राज्यात किती संघटनात्मक बदल होणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
POLITICS: Visit of Chandrakant Patil Amit Shah in Delhi; Now Fadnavis is in Delhi! Delhi winds of BJP leaders in the state increased; Will there be independence?
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्सची निवड, अनेक वर्षानंतर गोलंदाजाला बहुमान; उपकर्णधारपदी स्टीव्ह स्मिथची निवड
- दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली; मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यक्रम
- CONGRESS VS TMC : फोडा आणि राज्य करा ! तृणमूलमध्ये आलेले काँग्रेसचे ‘ते’ १२ आमदार फोडण्यामागे प्रशांत किशोर! ‘असा’ केला काँग्रेसचा घात
- एसटी संप निवळतोय; ९,७०५ कामगार रुजू; २१ डेपोंमधले कामकाज सुरू