विशेष प्रतिनिधी
नाशिक : वाढती पूरस्थिती, रस्त्यांवर साचणारे पाणी आणि उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई अशा परस्पर विरोधी गोष्टींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष पथकाला मंजुरी देण्यात आली आहे.Pimpri-Chinchwad and Pune; Fadnavis government approves special teams for both places
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या पथकाद्वारे भूगर्भजल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख केली जाणार आहे. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्याचा यशस्वी मुकाबला करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
– जलशक्ती अभियानाला गती
‘कॅच द रेन’, ‘जलशक्ती अभियान’ आणि ‘जलसंवर्धन जनभागीदारी’ यांसारख्या केंद्र शासनाच्या उपक्रमांना आता अधिक गती मिळणार असून, शहरांच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Pimpri-Chinchwad and Pune; Fadnavis government approves special teams for both places
महत्वाच्या बातम्या
- Taiwan : तैवानच्या रस्त्यांवर भारतविरोधी पोस्टर्स लागली; निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणाला- भारतीय मजुरांना हाकलून द्या
- राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!
- West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द
- CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही