विनायक ढेरे
नाशिक : भाजपच्या १२ आमदारांच्या कथित गैरवर्तनावरून त्यांच्या निलंबनाचा विषय चघळताना “बाराचा बदला बारा”ने घेतल्याचा बातम्या आणि विश्लेषणाचे रतीब कालपासून मराठी माध्यमे घालताना दिसत आहेत. पण त्यांच्या या बातम्या आणि विश्लेषण अर्धवट माहिती आणि पवारभक्तीयुक्त अंतःकरणाने भरलेल्या आहेत. Pawar politics; sharad pawar plyed same politics in 1992 while spliting shiv sena 12 MLAs
भाजपची आमदारसंख्या कमी करण्यासाठी महाविकास आघाडीने डाव खेळला. जाळे टाकले आणि भाजपचे आमदार त्या जाळ्यात अडकले वगैरे विश्लेषण खरे मानले तरी ते अर्धवट आहे. त्यातही बारा आकड्याचा खेळ करून भाजपच्या आमदारांवरील कारवाईच्या बातम्या देणे ही ओढून ताणून केलेली मशक्क्त वाटते.
आणि तसे म्हटले तर बारामती वगळूनही “बारा”चे नाते शरद पवारांशी फार जुने आहे. आपली ताकद ५० – ६० च्या रेंजच्या पलिकडे जात नाही ना, मग इतरांची ताकद कोणत्याही मार्गाने कमी करा, त्याशिवाय आपले राजकारण टिकणार नाही, हा पवारांचा खेळ फार जुना आहे. १९९२ ची शिवसेनेतली फूट आठवा. त्यावेळी बातम्या छगन भुजबळांचे बंड वगैरे अशा झाल्या होत्या. चर्चा शिवसेनेभोवती केंद्रीत होती. पण ती फूट पवारांनी पाडली होती. त्यावेळी पवारांनी शिवसेनेचे १८ आमदार फोडले होते. त्यापैकी ६ जणांनी शिवसेनेते घरवापसी केली होती. म्हणजे शिवसेनेतून फुटून पवारांबरोबर गेलेल्या आमदारांची संख्या बाराच राहिली होती.
आज भाजपमध्ये अशी उघड फूट पाडणे पवारांना शक्य नाही. कारण केंद्र आणि राज्यातील राजकीय परिस्थिती त्यांना तेवढी अनुकूल नाही. आणि पवारांनी तशा खेळी करायचा प्रयत्न केला तर वरून मोदी – शहा सहज ते ऐकून घेतील याचीही शक्यता नाही. त्यामुळे पवारांनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा मधला मार्ग स्वीकारला असावा.
आपला पक्ष वाढवून तो १०० पार नेण्याचे पवारांचे ध्येयच नाही. आपला पक्ष वाढला नाही तरी चालेल इतर पक्ष आपल्याच पातळीला खाली आणून खेळत राहायचे हा पवारांचा डाव आहे. भाजप लागोपाठ दोन विधानसभांमध्ये शंभरी पार करून गेला ना. मग त्याला शंभरीच्या आतमध्ये आणून ठेवणे एवढाच पवारांचा हेतू आहे आणि १२ आमदारांच्या वर्षभराच्या निलंबनाने तो साध्य करण्याचा प्रयत्न त्यांनी भास्कर जाधवांमार्फत केला आहे.
भास्कर जाधव आज जरी शिवसेनेचे आमदार असले, तरी ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. पवारांनी त्यांच्याकडून ही खेळी करून घेतल्याची शक्यता अधिक आहे. शिवसेना – भाजपच्या जवळ येण्याच्या बातम्या पाहता या शक्यतेला अधिक बळकटी येते.
Pawar politics; sharad pawar plyed same politics in 1992 while spliting shiv sena 12 MLAs
महत्त्वाच्या बातम्या
- शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्यासह ८० धारकऱ्यांवर गुन्हा
- १३० कोटी भारतीयांमध्ये BJP DNA असल्याचे मोहन भागवतांना सिध्द करायचेय काय?; तृणमूळचे खासदार मदन मित्रांचा सवाल
- आम्ही पाठिंबाच दिला, पण विधानसभेतील ठाकरे – पवार सरकारचा ठराव ही ओबीसींची दिशाभूल; फडणवीसांची स्पष्टोक्ती
- ठाकरे सरकारविरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार – अभिमन्यू पवार