वृत्तसंस्था
जालना : राज्यातील महाविकास आघाडीत आलबेल नसून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. आता तर ते एकमेकांचे बाप बाहेर काढू लागले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार-मंत्री, नेते मंडळीमध्ये हा संघर्ष पेटला आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष पेटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषा सुद्धा केली. Parbhani MP Sanjay Jadhav Attacked On NCP Chhagan Bhujbal
संजय जाधवांनी थेट छगन भुजबळांवर हल्ला चढवला. कमिशनरने आदेश देऊनही भुजबळांनी विरोधात पत्र लिहिलं, जशी याच्या बापाची जहागिर होती, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत किती राग आहे, याची झलक भाषणात स्पष्ट दिसले.
पहिल्यांदा भुजबळांचा बाप काढला
एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली… कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…. एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं…. जसं काय याच्या बापाची जहागिरीच आहे, असा एकेरी हल्ला त्यांनी भुजबळांवर चढवला.
नंतर राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा
“आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठपर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते, हे लक्षात ठेवा. राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो, हे तुम्हाला सांगतो, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला थेट इशाराच दिला.
दुसऱ्यांचं बघायचं वाकून.. राष्ट्रवादीची अवस्था
“आम्ही आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलोय. परभणी जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जसा मी काय मोठा अपराधच केलाय…. तुमचं सगळं जमतं…. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून…. अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जो काही आदेश येईल तो मान्य केला. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरु आहे, असं सांगत जाधव यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद किती टोकाला पोचलाय, याची जाणीव करुन दिली. मात्र पक्षीय कुरघोडीवर बोलताना भुजबळांचा बाप काढून त्यांचा तोल सुटलेला पाहायला मिळाला.
Parbhani MP Sanjay Jadhav Attacked On NCP Chhagan Bhujbal
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार
- अधिवेशनाचे २ आठवडे संसदेत नुसता गोंधळ : १०७ तासांपैकी केवळ १८ तास काम, १३३ कोटींचे नुकसान; राज्यसभा २१% , तर लोकसभेत फक्त १३% कामकाज