- विशेष प्रतिनिधी
अमरावती : Paratwada अमरावती पोलिसांना परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे.Paratwada
परतवाडा लैंगिक शोषणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर पीडित तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचे 5 मोबाईल फोन जप्त केले होते. या मोाईल्समध्ये सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व चॅट्स होते. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी ते डिलीट केले होते. स्थानिक पातळीवर हा डेटा रिकव्हर करणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी हे पाचही मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळे पाठवले होते.Paratwada
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, 3 मोबाईलमधील डेटा पूर्णपणे रिकव्हर झाला आहे. त्यामुळे डिलीट केलेले व्हिडिओ व फोटो पुन्हा रिस्टोअर झालेत. या रिकव्हर डेटाच्या मदतीने आता पोलिस या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच या प्रकरणी आणखी काही तरुणींची फसवणूक झाली आहे का? याचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रकरणी आरोपींच्या बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराचीही चौकशी केली जाणार आहे.
15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवण्यात यश
दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील एका 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना न घाबरता समोर येण्याचे आवाहन केले होते. अमरावतीचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने यासंबंधी रात्रंदिवस तपास करून या पीडित मुलीचा नागपुरात शोध घेतला होता. अखेर ती शनिवारी अमरावतीत आली आणि तिने आपला जबाब नोंदवला.
नेमके काय आहे परतवाडा प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींना प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल करण्याची गंभीर समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद नामक मुख्य आरोपीसह इतर काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने सोशल मीडियाच्या मदतीने पीडित तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. त्यांचे अश्लील व्हिडिओ व फोटोही व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
Paratwada Case Update: Police Recover Data from 3 Out of 5 Seized
महत्वाच्या बातम्या
- Africa Detour : आफ्रिकेला वळसा घालून मध्य पूर्वेकडे जात आहे अमेरिकन युद्धनौका; हुती बंडखोरांच्या हल्ल्याची भीती
- Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा
- Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;
- उन्हाळा आणि पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी AI द्या भर; ऊर्जा विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश