मुलुंडमध्ये मराठी महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुलुंड परिसरातील एका सोसायटीमध्येकाल फ्लॅटसाठी चौकशी करण्यास गेलेल्या तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला अत्यंत वाईट अनुभव आला. केवळ मराठी असल्याने त्यांना त्या ठिकाणी फ्लॅट नाकारला गेला. एवढच नाहीतर त्यांना व त्यांच्या पतीला धक्काबुक्की देखील झाली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये त्यांनी शूट केला व तो सोशल मीडियावर प्रसारित करून, घडलेली संतापजनक घटना जगासमोर आणली आणि आपली व्यथा मांडली. Pankaja Munde also had a bitter experience of buying a house in Mumbai
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वचस्तरातून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. एवढच नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित सोसायटीत जाऊन, मराठी माणसाला फ्लॅट देत नाही असे सांगणाऱ्या पिता-पुत्राला चांगलीच समज दिली. यानंतर त्यांना जाहीर माफी देखील मागायला लावली. दरम्यान या दोघांविरोधात मुलुंड पोलिसात रात्री गुन्हा देखील दाखल झाला व त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेवर कालापासून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही मुंबईत घर घेताना असाच काहीसा अनुभव आला होता, त्यामुळे त्यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना याचा उल्लेख केला आहे.
फेसबुकवरील व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे म्हणतात, ”नमस्कार, माफ करा थोडी प्रकृती खराब आहे त्यामुळे जरा बोलयाला त्रास होतोय. याचबरोबर थोडी मनस्थितीही खराब आहे. आजकालचं राजकारणातील वातावरण, एकूणच समाजातील वातावरण. इतकं सगळं असताना, इतकी सगळी समृद्धी असताना. रस्ते आहेत, हायवे आहेत. लोकांना सगळ्या सुविधा आहेत. सगळ्यांकडे गाड्या आहेत, साधनं आहेत. हे सगळं असतानाही समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते.”
”आरक्षणाची भांडणं सुरू आहेत. विविध समाजेच लोक, कुणी मुंडन करतय, कुणी आंदोलन करत अजून काही करतंय हे सगळं बघून हृदयाला पिळ पडतो. त्याचबरोर प्रत्येक रंगामध्ये माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, पिवळा, निळा आहे. हे सगळं बघून कधी कधी असं वाटतं की, सगळे रंग जर एका चक्रावर बसून जोरजारत फिरवले तर त्यातून एक पांढरा रंग निर्माण होतो. जो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्यापेल याची मी प्रतीक्षा करते आहे.”
”मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित”
याचबरोबर ”आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद यावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराची नावं ठेवावीत यामध्ये मी फार कधी उडी घेतली नाही. परंतु एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती, की ते इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे चालणार नाही. हे म्हणत असताना तिच्याबरोबर जो प्रकार झाला, तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे. कारण, जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं. तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला. की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. मी कोणत्याही एका भाषेची, एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने नटलेलं आहे. ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे. त्यामुळे इथे सर्वजणांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही, असं जर काही इमारतींमध्ये सांगितलं जात असेल तर हे फार दुर्दैवी आहे. माझ्या सारख्या व्यक्तीला देखील याचा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे. या देशामधील प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्याच्या प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या लोकांना घर देण्यासाठी, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता का आहे? असा माझा प्रश्न आहे.” असं म्हणत त्यांनी मुलुंडमध्ये मराठी महिलेाबाबत घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
याशिवाय ”आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. आपण गणपतीचं विसर्जन नाही करायचं, गणेशाचा आशीर्वाद घेऊन सगळ्या नकारात्मकतेचं विसर्जन करायचं. सगळ्या वादांचं जात, धर्म, प्रांत या भेदभावाचं विसर्जन करायचं असं नाही का ठरवू शकत.” असंही पंकजा मुंडे यांनी शेवटी म्हटलं आहे.
Pankaja Munde also had a bitter experience of buying a house in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा
- Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक सुवर्ण, पुरुष संघाने केला विश्वविक्रम
- इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण
- राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या