प्रतिनिधी
मुंबई : राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा विरोधक घडवत असताना त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. पण मंगळवारी त्यांनी यासंबंधी प्रथमच भाष्य करत राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा करणारे ठार वेडे असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. सत्ता गेल्यामुळे विरोधकांना काहीही सूचत नाही. त्यांना वेड लागले आहे. त्यामुळेच ते नेतृत्व बदलाची भाषा करत आहेत, असे शरसंधान शिंदे यांनी साधले.Opponents went mad because of the loss of power; The Chief Minister will change; Commentary by Eknath Shinde
विरोधकांना उपचारांची गरज
सत्ता गेल्यामुळे काही लोकांना वेड लागले आहे. त्यातून ते सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशी विधाने करत आहेत. आमचे सरकार दिवसागणिक मजबूत होत असून, सत्ता गेल्यामुळे ज्यांना वेड लागले आहे, त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
का सुरू झाली होती चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशापासून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुण्यात अजित पवार व अमित शहा यांची एक भेट झाली. त्यानंतर शिंदे आजारी पडले अन् गावाला गेले. त्यामुळे या चर्चेला मोठे बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गट आणि अन्य विरोधी पक्षांवर ही टीका केली आहे.
शिंदेंना आला होता ताप
ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी कठोर शब्दांत त्यांची बाजू मांडली होती. ते म्हणाले होते की, आम्ही मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यांचा ताप 103 पर्यंत गेला होता. सातत्याने होणारी धावपळ आणि दगदगीतून हे दुखणे आले असावे. राज्यात नेतृत्व बदल करण्यासाठी आजारपणाचे सोंग करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते.
राज्यात 2024 पर्यंत नेतृत्व बदल होणार नसल्याचा दावाही बच्चू कडू यांनी यासंबंधी केला होता. राज्यात 2024 पर्यंत कोणताही नेतृत्व बदल होणार नाही. जर झाला तर तो महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यासंबंधी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला होता.
Opponents went mad because of the loss of power; The Chief Minister will change; Commentary by Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!