विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माणआहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सीबीआयकडे चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे.Once again, the conflict between the Maharashtra government and the CBI; Chief Secretary, Director General of Police refuses to go to CBI office for questioning
सीबीआयने कुंटे आणि पांडे यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुली संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, दोघांनीही सीबीआय कार्यालयात येण्यास नकार दिल्याची माहिती आहे. दोघांनी म्हटले आहे की सीबीआय त्यांच्या कार्यालयात येऊन चौकशी करू शकते.यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणामध्ये देखील राज्य आणि सीबीआयमधील झाला होता.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या 100 कोटींच्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसत नाहीत.
या प्रकरणाचे तक्रारदार परमबीर सिंह देखील अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. अटक होण्याच्या भीतीने ते देश सोडून जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात लुक आउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच परमबीर सिंह यांच्याविरोधात तीन ठिकाणांहून वॉरंट जारी करण्यात आले आहे.
यापैकी एक वॉरंट एक सदस्यीय चांदीवाल आयोगाने जारी केला आहे. राज्य सरकारने परमबीर यांच्या 100 कोटींच्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. अनेक वेळा बोलावून देखील परमबीर या आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्यांना दोनदा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
आता सिंह यांना शेवटची संधी देत त्यांना 6 ऑक्टोबर रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. जर या दिवशी माजी आयुक्त आयोगासमोर हजर झाले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते.
Once again, the conflict between the Maharashtra government and the CBI; Chief Secretary, Director General of Police refuses to go to CBI office for questioning
महत्त्वाच्या बातम्या
- आजपासून गॅस सिलिंडरचे दरामध्ये वाढ, नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम; १ ऑक्टोबरपासून लागू झाले हे ६ मोठे बदल
- अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेल्या मिरज दंगलीचा खटला ठाकरे- पवार सरकारकडून मागे; १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Letter to PM CM : पत्रास कारण की, आमचे दात येत नाहीयेत; चिमुकल्यांना मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच भन्नाट उत्तर ; म्हणाले..
- शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा , शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
- Mumbai 26/11 Terror Attack : अर्णब गोस्वामीच्या डिबेट शोमध्ये-पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच 26/11 हल्ला घडवून आणला- इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली