• Download App
    आता यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी ची गुणवत्ता यादी, निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा । Now MPSC merit list like UPSC, improvements in selection process

    आता यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी ची गुणवत्ता यादी, निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा

    आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होणार आहे. Now MPSC merit list like UPSC, improvements in selection process


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होणार आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेतील निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित कार्यपद्धत २०२० आणि त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियेपासून लागू करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.



    आता मुलाखत झाल्यावर शिफारसपात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. त्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होतो. मात्र, यापुढे पदांचा पसंतीक्रम गुणवत्ता यादीनंतर घेतला जाणार असल्याने मुलाखतीचा टप्पा झाल्यावर निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

    लेखी परीक्षा, मुलाखतीतील गुण याबाबत माहिती नसल्याने उमेदवाराकडून सर्व पदांचे पसंतीक्रम दिले जातात. त्यामुळे पदे अडवली जातात. उदाहरणार्थ सेवेत असलेल्या उमेदवाराची त्याच पदासाठी किंवा त्याच संवर्गातील पदासाठी निवड होते. मात्र, आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर पसंतीक्रम मागवले जाणार असल्याने उमेदवाराला त्याच्या गुणांनुसार पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे पदे अडवली जाण्याचे प्रकार थांबतील.

    Now MPSC merit list like UPSC, improvements in selection process

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!