विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील निवडणूक लढवणार महाविकास आघाडी, पण जनतेला गॅरंटी कार्ड देणार मात्र काँग्रेसचे!! काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात खुलासा केला. दिवाळीपूर्वी काँग्रेसचे गॅरंटी कार्ड आणि जाहीरनामा प्रकाशित करू, असे ते म्हणाले. On the Congress Guarantee Card, party leader Vijay Wadettiwar election candidate
महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही तोच वडेट्टीवार यांच्या वक्तव्यातून गॅरंटी कार्डचा वाद सुरू झाला आहे. कारण महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रकाशित होणे अपेक्षित असताना काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करणार, तो देखील 30 तारखेला गॅरंटी कार्ड सहज जनतेला देणार, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक हरियाणामध्ये अशीच गॅरंटी कार्ड दिली होती. त्यामध्ये मोठमोठे वादे केले. हिमाचल आणि कर्नाटक मधली निवडणूक जिंकल्यानंतर देखील त्या गॅरंटी कार्ड मधले वायदे पूर्ण करता आले नाहीत. कारण राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला. महाराष्ट्रात अशाच प्रकारचे गॅरंटी कार्ड वाटून काँग्रेसची गॅरंटी महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्यावर लादणार असेल, तर ते दोन पक्ष काँग्रेसचे गॅरंटी कार्ड सहन करतील का??, हा सवाल तयार झाला आहे. कारण काँग्रेसच्या गॅरंटी कार्ड मधले वायदे पूर्ण झाले नाहीत, तर त्याचे खापर काँग्रेस बरोबर आपल्यावर फुटण्याची भीती या दोन्ही पक्षांना वाटायला लागली आहे.
On the Congress Guarantee Card, party leader Vijay Wadettiwar election candidate
महत्वाच्या बातम्या
- 100 percent voting विकासाचे फळ चाखण्यासाठी १०० टक्के मतदान हवे
- Nawab Malik भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम; अजितदादांची गोची की त्यांचीच फूस??
- Israeli : इस्रायलच्या हवाई हल्ल्याने इराण संतप्त ; धमकी देत म्हटले, हल्ल्याचे…
- Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच बचत योजनांवर FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज!