• Download App
    केंद्रातील नंबर १ आणि नंबर २ राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करताहेत, छापे आणखी वाढतील; शरद पवारांचा इशारा । No. 1 and No. 2 at the Center are targeting NCP leaders, raids will increase; Sharad Pawar's warning

    केंद्रातील नंबर १ आणि नंबर २ राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करताहेत, छापे आणखी वाढतील; शरद पवारांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता केंद्रातील ‘नंबर १’ आणि ‘नंबर २’ हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. अजित पवार आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरावर पडलेले छापे हा त्याचाच एक भाग आहे. यानंतरच्या काळात सूडबुद्धीने असे छापे टाकणे वाढणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. No. 1 and No. 2 at the Center are targeting NCP leaders, raids will increase; Sharad Pawar’s warning

    अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुणी कितीही टार्गेट केले तरी घाबरण्याचे कारण नाही, आपण पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करू, असा इशाराही शरद पवार यांनी दिला. महाराष्ट्रातील आगामी महापालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. त्यावेळी पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.


    सोलापुरात शरद पवार यांच्या भाषणात “टार्गेट”वर भाजप; फोडली मात्र काँग्रेस!!


    महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने सर्वोतोपरी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. सरकार पाडण्यासाठी मलाही या ऑफर देण्यात आल्या, पण काही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर आलेल्या निराशेमुळे सूड घेण्याचे राजकरण सुरु आहे, असा दावा देखील शरद पवार यांनी केला.

    यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. आगामी काळात जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 36 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता मेळावे घेणार आहे. तसेच आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आघाडीबाबत स्थानिक पातळीवरील गणिते बघून निर्णय घेतले जाणार असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

    No. 1 and No. 2 at the Center are targeting NCP leaders, raids will increase; Sharad Pawar’s warning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!