• Download App
    ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवताहेत; नितीन राऊत राऊतांचा|Nitin Raut targets Sharad Pawar over his remarks on congress

    ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवताहेत; नितीन राऊत राऊतांचा पवारांवर निशाणा

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर काँग्रेसकडून सर्वात टोकदार प्रतिक्रिया ठाकरे – पवार सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.Nitin Raut targets Sharad Pawar over his remarks on congress

    शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कधीही महाराष्ट्रात बसवता आलेला नाही. या विषयावरून राऊत यांनी पवारांना टोचले आहे. ममता बॅनर्जी, मायावती यांनी बहुमत मिळून पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश जिंकून दाखवले.



    त्या मुख्यमंत्री झाल्या पण ज्यांना स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीही बसवता आलेला नाही ते काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. त्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे पहावे, अशा बोचऱ्या शब्दात नितीन राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

    या आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर टीका केली होती. ज्यांना काँग्रेसने जमीन राखायला दिली त्या राखणदारांनीच जमीन हडपली, अशा शब्दांत नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यानंतर नितीन राऊत यांनी पवारांवर टीका केली आहे. काँग्रेसवरची पवारांची टीका यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

    Nitin Raut targets Sharad Pawar over his remarks on congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Prakash Mahajan : शिबिरात बोलावणे नसल्याने प्रकाश महाजन यांचा उद्विग्न सवाल, मी जिवंत का?

    Captain Shubanshu : कॅप्टन शुभांशू स्वागतम्, आम्हाला आपला अभिमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

    Chief Minister : गुंजवणी सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश