प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा शोध महाराष्ट्र पोलीस घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावरून सिंधुदुर्ग पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पाठवली.Nitesh Rane – Narayan Rane case: Shiv Sena-BJP leaders accuse each other of politics of revenge
नारायण राणे प्रत्यक्षात तेथे हजर राहिलेले नाहीत. परंतु या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार घमासान सुरू झाले असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर सूडाचे राजकारण चालवल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्राच्या पोलिसांना बाकीच्या गुन्हेगारांना पकडायला वेळ नाही. पण एका आमदाराच्या मागे लागायला वेळ आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.
त्याच वेळी भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे – पवार सरकारवर तोंडाने फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि वागायचे तालिबान्यांसारखे असा आरोप केला आहे.
या आरोपांना शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या आणि आमच्या सारख्या नेत्यांच्या पाठीमागे लावून भाजपचेच नेते आमच्यावर सूड उगवत आहेत,
असा आरोप संजय राऊत यांनी नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना केला. नारायण राणे विरुद्ध ठाकरे या राजकीय घमासान आत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची एकमेकांमध्ये जोरदार जुंपल्याचे आता दिसत आहे.
Nitesh Rane – Narayan Rane case: Shiv Sena-BJP leaders accuse each other of politics of revenge
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यापीठ सुधारणा विधेयक : एकीकडे राज्यपालांच्या अधिकारांना कात्री!! तरीही महाविकास आघाडीला त्यांच्या सहकार्याची “खात्री”…??
- संकट ओमिक्रॉनचे : 27 दिवसांत 781 रुग्णसंख्या, ‘ओमिक्रॉन’च्या स्फोटामुळे देशाच्या चिंतेत भर
- कालीचरण महाराजांवर पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
- Malegaon Blast : सुनावणीदरम्यान साक्षीदार म्हणाला – एटीएसने योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय नेत्यांवर गोवण्याचा दबाव टाकला