• Download App
    NCPs; In reality, voting in Pawar's stronghold, Baramati, is declining!! राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा नुसताच गदारोळ; प्रत्यक्षात पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मतदानाची घसरण!!

    राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा नुसताच गदारोळ; प्रत्यक्षात पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मतदानाची घसरण!!

    Sharad Pawar'

    नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा नुसताच गदारोळ प्रत्यक्षात पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मतदानाची घसरण आणि त्याकडे कुणाचेच लक्ष नाही, असे राजकीय चित्र आज समोर आले.NCPs; In reality, voting in Pawar’s stronghold, Baramati, is declining!!

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात जोरदार गदारोळ मांडला. जणू काही अजित पवारांची शेवटची इच्छा पुरी करण्याची जबाबदारी फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहे असा भास त्यांनी निर्माण केला. प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊनच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लढवल्या पण महापालिकांमध्ये दोघांचा एकत्रितरित्या दारुण पराभव झाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमधली सत्ता अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येऊन सुद्धा खेचून घेता आली नाही.



     

    त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितच लढल्या, पण या एकत्रीकरणाचा परिणाम मतदारांवर झाल्याचे दिसले नाही. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कुठला प्रचार केला नाही, हे खरे, पण पवार कुटुंबाने बारामती तळ ठोकला होता. पण त्याचाही परिणाम बारामतीतल्या मतदारांवर झाला नाही पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बारामती तालुक्यात सगळ्यांत कमी मतदान झाले. अजित पवारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती मतदारांना घराबाहेर काढू शकली नाही. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा सुद्धा मतदारांवर प्रभाव निर्माण करू शकला नाही. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात फक्त 54 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी धाय मोकत असलेले नेते मतदारांना मात्र घराबाहेर काढून मतदान घडवून आणू शकले नाहीत.

    जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल काय लागायचा तो लागला तरी बारामतीत सर्वांत कमी मतदान झाले, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही.

    – पुणे जिल्ह्यात सरासरी झालेल्या मतदानाची आकडेवारी

    – जुन्नर : ६१.१८ टक्के

    – आंबेगाव: ६५.३० टक्के

    – शिरूर: ७५.६९ टक्के

    – खेड: ७५.४६ टक्के

    – मावळ: ७७.४३ टक्के

    – मुळशी: ६३.७९ टक्के

    – हवेली: ६८.०२ टक्के

    – दौंड : ६५ टक्के

    – पुरंदर : ६८.३७ टक्के

    – वेल्हे : ७९.३० टक्के

    – भोर : ७५.६२ टक्के

    – बारामती : ५४.९० टक्के

    – इंदापूर : ६५.६७ टक्के

    सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार

    जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे सुनेत्रा पवार यांनी आभार मानले आहेत. अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    NCPs; In reality, voting in Pawar’s stronghold, Baramati, is declining!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?