• Download App
    अजित पवारांवरील प्राप्तिकर खात्याच्या छापेमारीचा राष्ट्रवादीकडून निषेध, पुण्यात कौन्सिल हॉलसमोर कार्यकर्त्यांची तोबा गर्दी। NCP Workers protests Against IT raid on Deputy CM Ajit Pawar, crowd of NCP Workers in front of Council Hall in Pune

    अजित पवारांवरील प्राप्तिकर खात्याच्या छापेमारीचा राष्ट्रवादीकडून निषेध, पुण्यात कौन्सिल हॉलसमोर कार्यकर्त्यांची तोबा गर्दी

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर प्राप्तिक विभागाने धाडी टाकल्या. हे छापे अद्यापही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील कौन्सिल हॉल समोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी केंद्र सरकार व भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मानवी साखळी तयार केली होती. NCP Workers protests Against IT raid on Deputy CM Ajit Pawar, crowd of NCP Workers in front of Council Hall in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर प्राप्तिक विभागाने धाडी टाकल्या. हे छापे अद्यापही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील कौन्सिल हॉल समोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी केंद्र सरकार व भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मानवी साखळी तयार केली होती.

    अजित पवार यांचा शुक्रवारी पुणे दौरा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार यांना काऊन्सिल हॉलबाहेर यावं लागलं. त्यावेळी अजित पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कार्यकर्त्यांच्या हातात पाठिंब्याचे बॅनरही होते.



    याप्रकरणी अजित पवारांनी सध्या पाहुणे घरात आलेले आहेत, ते गेल्यानंतर भूमिका मांडतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुसरीकडे, सोलापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की, “काल अजित पवार यांच्याकडे सरकारी पाहुणे येऊन गेले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या अगोदर मला इडीची नोटीस आली होती त्यामुळं मी स्वतः ईडीच्या ऑफिसला गेलो आणि नंतर महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवलं.”

    दरम्यान, पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅसदर वाढ आणि महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं. प्रशांत जगताप आणि रूपालीताई चाकणकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, कोरोना आढावा बैठकीसाठी अजित पवार आज पुणै दौऱ्यावर आले आहेत. कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर अजितदादा कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीला खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी उपस्थित आहेत.

    NCP Workers protests Against IT raid on Deputy CM Ajit Pawar, crowd of NCP Workers in front of Council Hall in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!